सेनेच्या बालेकिल्ल्यात राणे लढणार!

By Admin | Published: March 12, 2015 05:14 AM2015-03-12T05:14:38+5:302015-03-12T05:14:38+5:30

वांद्रे पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यापुढे उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र याबाबत आपला निर्णय २३ तारखेला

Rane will fight in army mansion | सेनेच्या बालेकिल्ल्यात राणे लढणार!

सेनेच्या बालेकिल्ल्यात राणे लढणार!

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, मुंबई
वांद्रे पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यापुढे उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र याबाबत आपला निर्णय २३ तारखेला जाहीर करु, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे.
वांद्रे पूर्व चे शिवसेनेचे आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांचे निधन झाल्यामुळे त्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राणे यांना माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी राणे यांना हा प्रस्ताव दिला होता. मात्र मधल्या काळात प्रदेशाध्यक्षपदी खा. अशोक चव्हाण यांची निवड झाली. त्यावर राणे यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली नसली तरी ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आपण परदेशातून आल्यानंतर आपली भूमिका जाहीर करु असे राणे म्हणाले होते. वांद्रे पूर्व मधून आपण निवडून येऊ शकता, असे राणे यांच्या समर्थकांना वाटते. या मतदारसंघात दीड लाख मुस्लिम मतदार आहेत. याच ठिकाणी एमआयएमने २३ हजार मते मिळवली होती. भाजपा आणि राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करण्याच्या मनस्थितीत नाही, शिवाय शिवसेनेचे तीन चार गट त्या मतदारसंघात आहेत. शिवसेनेने कोणाला उमेदवारी द्यावी याविषयी त्यांच्यात मतमतांतरे आहेत. अशा स्थीतीत जर सगळ्यांनी साथ दिली तर राणे निवडून येऊ शकतात असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र जर राणे मैदानात उतरले तर मात्र
शिवसेना त्वेषाने लढेल, त्यात जर राणेंचा पराभव झाला तर तो आपल्या राजकीय कारकिर्दीला मागे नेणारा असेल.
याबाबत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी दिल्लीत आहे. उद्या मुंबईला येईन. पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करेन. त्यानंतर सार्वमताने निर्णय घेतला जाईल.

Web Title: Rane will fight in army mansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.