शिवसेनेच्या वाघासमोर राणे किस झाड की पत्ती - उद्धव ठाकरे

By Admin | Published: April 16, 2015 09:32 AM2015-04-16T09:32:27+5:302015-04-16T11:12:51+5:30

शिवसेनेच्या विरोधात कोणी कितीही वल्गना व गर्जना केल्या तरी शिवसेनेच्या वाघासमोर भलभले पडले आहेत. मग राणे हे किस झाड की पत्ती अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणेंचा समाचार घेतला आहे.

Rane's tree in front of Shiv Sena's tiger - Uddhav Thackeray | शिवसेनेच्या वाघासमोर राणे किस झाड की पत्ती - उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या वाघासमोर राणे किस झाड की पत्ती - उद्धव ठाकरे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १६ - शिवसेनेच्या विरोधात कोणी कितीही वल्गना व गर्जना केल्या तरी शिवसेनेच्या वाघासमोर भलभले पडले आहेत. मग राणे हे किस झाड की पत्ती, ही पत्तीही पाचोऴ्यासारखी उडून गेली अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंचा खरपूस समाचार घेतला आहे.नारायण राणेंनी वांद्य्रातील निवडणुकीत पैसा ओतूनही त्यांना पराभव सोसावा लागला असे ठाकरेंनी म्हटले आहे. 

मातोश्रीच्या अंगणात पार पडलेल्या वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव करत विजय मिळवला. यानंतर गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना चिमटे काढले. श्रद्धा व निष्ठेची पूजा करणा-यांसाठी मातोश्री हे अंगण आहे, पण अंगावर येणा-या बेइमानांसाठी हे अंगण नसून रणमैदान आहे असे सांगत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर निशाणा साधला. नारोबा सारख्या लोकांचा पराभव शिवसेना कुठेही करु शकते. शिवसेनेने नारायण राणेंचा  कुडाळमध्ये १० हजार मतांनी व आता वांद्रे पूर्वमध्ये २० हजार मतांनी पराभव केला होता. पुढच्या निवडणुकीत हे महाशय तिप्पट मतांनी पडतील अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निजाम व रझाकारांचे ओवेसी बंधूंचाही या निवडणुकीत सुपडा साफ झाला असून महाराष्ट्र हा मर्द मराठ्यांचे राज्य असून इथे बेइमान व राष्ट्रद्रोही धर्मांध सापांना कुणी दूधही पाजणार नाही असेही त्यांनी सुनावले आहे. 

 

Web Title: Rane's tree in front of Shiv Sena's tiger - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.