मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:35 PM2017-08-13T23:35:00+5:302017-08-13T23:35:06+5:30

39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रंगनाथ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) रविवारी (दि.१३) झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Ranganath Tiwari as president of Marathwada Sahitya Sammelan | मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ तिवारी

मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ तिवारी

Next

औरंगाबाद, दि. 13 - 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रंगनाथ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) रविवारी (दि.१३) झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी ‘मसाप’तर्फे दिल्या जाणा-या जीवनगौरव पुरस्कारासाठी मधुकरराव मुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ‘मसाप’आणि  बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २३-२४ डिसेंबर रोजी अंबाजोगाई येथे हे साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे.

प्रा. रंगनाथ तिवारी अमराठी असूनही त्यांनी मराठीमध्ये दर्जेदार साहित्यनिर्मिती करून साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली. एक उत्तम कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिभा असाधारण आहे. कादंबरीसह नाटक, कथा, समीक्षा आणि अनुवाद अशा वैविध्यपूर्ण वाङ्मय प्रकारांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यामुळे मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली, असे ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले.

उस्मानाबादेत वर्धापन सोहळा

यंदा ‘मसाप’चे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होत असून, उस्मानाबाद येथे २९ सप्टेंबर रोेजी परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त उस्मानाबाद येथे परिषदेतर्फे बांधण्यात येणाºया ‘संत गोरोबा काका’ सभागृहाचे पी. डी. पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनदेखील केले जाणार आहे. ‘मसाप’च्या ७५ व्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यात परिषदेचे विश्वस्त मधुकर मुळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  

परिषदेच्या अमृतमहोत्सवी वर्षात ‘मराठवाडा वाङ्मयीन इतिहास’ हा लेखन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. यावेळी उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, भास्कर बडे, आसाराम लोमटे, रसिका देशमुख, के. एस. अतकरे, डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. विलास वैद्य, प्रा. शेषराव मोहिते, डॉ. संजीवनी तडेगावकर, दगडू लोमटे, डॉ. सतीश साळुंके, नितीन तावडे, जीवन कुलकर्णी, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. दिलीप बिरुटे, विलास सिंदगीकर आणि प्रा. सुरेश जाधव उपस्थित होते.

अध्यक्षांचा परिचय

- प्रा. रंगनाथ तिवारी यांनी दीर्घकाळ अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. 

-‘संपल्या सुरावटी’, ‘उत्तम पुरुष : एक वचन’, ‘देवगिरी बिलावल’, ‘बेगम समरू’, ‘अनन्वय’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबºया.

- मराठी व हिंदी भाषेतील ७ कादंबºया, २ नाटके, १ कथासंग्रह, २ समीक्षा ग्रंथ आणि अनुवाद अशी त्यांची ग्रंथसंपदा.

- त्यांची ‘निशिगंधा’ ही अनुवादित कादंबरी प्रकशित होण्यापूर्वी ‘लोकमत’मध्ये लेखमालेच्या स्वरूपात प्रकाशित झाली होती.

- लेखमालेला ‘लोकमत’च्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

संधी दिल्याबद्दल आभार

मराठवाडा साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याचे वृत्त कळल्यावर खूप आनंद वाटला. माझ्यावर, माझ्या साहित्यावर प्रेम करणाºयांनी ही संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. - प्रा. रंगनाथ तिवारी

Web Title: Ranganath Tiwari as president of Marathwada Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.