राईनपाडा हत्याकांड; २७ आरोपींना कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:20 AM2018-07-10T06:20:13+5:302018-07-10T06:20:25+5:30

राईनपाडा येथे मुले पळविणारे समजून जमावाने पाच भिक्षुकांच्या केलेल्या हत्येप्रकरणी २५ आरोपींना न्यायालयीन कोठडी तर रविवारी अटक केलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश साक्री न्यायालयाने सोमवारी दिले.

 Ranipada massacre; 27 accused in custody | राईनपाडा हत्याकांड; २७ आरोपींना कोठडी

राईनपाडा हत्याकांड; २७ आरोपींना कोठडी

Next

धुळे : राईनपाडा येथे मुले पळविणारे समजून जमावाने पाच भिक्षुकांच्या केलेल्या हत्येप्रकरणी २५ आरोपींना न्यायालयीन कोठडी तर रविवारी अटक केलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश साक्री न्यायालयाने सोमवारी दिले.
दुपारी पोलीस बंदोबस्तात सर्व आरोपींना न्यायालयात आणण्यात आले. राईनपाडा या आदिवासीबहुल भागात १ जुलै रोजी हत्याकांड घडले होते. अफवेमुळे बळावलेल्या संयशातून मंगळवेढा येथील पाच निरपराध भिक्षुकांना जमावाने ठेचून मारले होते. आतापर्यंत २७ आरोपींना अटक झाली आहे. पिंपळनेर पोलिसांत १२ प्रमुख संशयितांसह जमावाविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. २३ संशयितांना दुसऱ्या दिवशीच अटक केली होती. १२ प्रमुख फरार संशयितांपैकी चौघांना पकडण्यात आले आहे. रविवारी दशरथ पिंपळसे व गुलाब पाडवी यांना अटक करण्यात आली.

करमाळा तहसीलवर मोर्चा
जेऊर (सोलापूर): साक्री घटनेच्या निषेधार्थ नाथपंथीय डवरी समाजातर्फे सोमवारी करमाळा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना जलद न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबाच्या वारसदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, प्रत्येक पीडिताच्या कुटुंबाला २५ लाखांचे आर्थिक सहाय्य करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

Web Title:  Ranipada massacre; 27 accused in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.