नाशिकच्या महापौरपदी रंजना भानसी; उपमहापौर गिते

By admin | Published: March 14, 2017 12:58 PM2017-03-14T12:58:58+5:302017-03-14T13:17:55+5:30

महापालिका निवडणूकीत भाजपाने शहरात बहुमत प्राप्त केल्याने मंगळवारी (दि.१४) दुपारी बाराच्या मुहूर्तावर अखेर महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रामायण’ व महापालिकेवर भाजपाचा ध्वज फडकला.

Ranjana Bhansi as the mayor of Nashik; Deputy Mayor Gite | नाशिकच्या महापौरपदी रंजना भानसी; उपमहापौर गिते

नाशिकच्या महापौरपदी रंजना भानसी; उपमहापौर गिते

Next




नाशिक : महापालिका निवडणूकीत भाजपाने शहरात बहुमत प्राप्त केल्याने मंगळवारी (दि.१४) दुपारी बाराच्या मुहूर्तावर अखेर महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रामायण’ व महापालिकेवर भाजपाचा ध्वज फडकला. यावेळी महापौरपदासाठी आरक्षित जागेतून एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने रंजना भानसी यांची निवड करण्यात आली. तसेच उपमहापौरपदासाठी रिंगणात असलेल्या सुषमा पगारे यांनी माघार घेतल्यामुळे प्रथमेश गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एकूणच भानसी या भाजपाच्या जेष्ठ कार्यकर्त्या असून त्यांनी पक्षासोबत राखलेल्या निष्ठेचे फळ अखेर त्यांना मिळाले तर नव्यानेच पक्षात आलेले ‘मनसे’चे वसंत गिते यांचे पुत्र यंदा या पंचवार्षिक निवडणूकीतून राजकारणात आले. प्रथमेश गिते हे पहिल्यांदांच नगरसेवक म्हणून निवडून आले अन् शहराच्या उपमहापौरपदाच्या खुर्चीचा मान त्यांना मिळाला.
राज्याचे जलसंपदामंत्री व पालकमंत्री गिरिश महाजन, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप यांच्यासह सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रामायणाबाहेर जल्लोष केला . ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत भाजपाने सत्ता स्थापन केल्याचा आनंदोत्सव साजरा केला. नाशिकच्या सर्वागिंण विकासाची जबाबदारी या पक्षाच्या खांद्यावर असून मुंबई, पुणे या सुवर्ण त्रिकोणातील नाशिकला औद्योगिकदृष्टया तसेच पर्यटनाच्या दृष्टीने विकासाच्या दिशेने प्रगतीपथावर नेण्याचे आव्हान या पक्षापुढे आहे. नाशिककरांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये नवखा असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या बाजूने कौल देत राज ठाकरे यांना एकहाती सत्ता सोपविली होती; मात्र पाच वर्षांच्या कालावधीत शहराचा ‘मनसे’ विकास करण्यास यश आले नाही. नाशिकरांनी नाराजी यंदाच्या पंचवार्षिकमध्ये दाखवून देत भाजपाला बहुमत दिले आहे. यामुळे नाशिकरांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे मोठे आव्हान भाजपाचे महापौर तसेच पालकमंत्र्यांसह आमदारांपुढे आहे. भाजपाने आपल्या वचननाम्यात म्हटल्याप्रमाणे गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच ही दक्षिणगंगा बारामाही प्रवाहित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष प्रयत्न भाजपाला करुन दाखवावे लागणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Ranjana Bhansi as the mayor of Nashik; Deputy Mayor Gite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.