डिसले गुरुजींची आता राज्यभरात ‘शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 02:05 AM2021-02-11T02:05:46+5:302021-02-11T02:07:45+5:30

जि. प.च्या शाळांमध्ये उपक्रम

ranjitsinh disale to guide in all districts schools | डिसले गुरुजींची आता राज्यभरात ‘शाळा’

डिसले गुरुजींची आता राज्यभरात ‘शाळा’

googlenewsNext

मुंबई : ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात आता सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

डिसले यांच्या कार्यातून सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांना परिचय व्हावा यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ते कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.  
 
तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्यामुळे सोलापूर जि. प. प्राथमिक शिक्षक  असलेले डिसले यांची ‘जगातील सर्वोत्तम शिक्षक’ म्हणून निवड झाली होती.  

शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी...
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्यासाठी  डिसले यांनी १६ हजारपेक्षा अधिक शिक्षकांना मार्गदर्शन केले असून राज्यातील शिक्षकांना त्याचा फायदा होत आहे.  
इतर शिक्षकांनाही  डिसले यांच्या कामाची ओळख व्हावी, तसेच शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम सुरू करण्याचे शासनाने ठरविले आहे. 
सर्व जिल्हा परिषदांनी या उपक्रमामधून आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम निश्चित करावा, अशा सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: ranjitsinh disale to guide in all districts schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.