राज्यपालांची भेट घेऊन डिसले गुरुजी निघाले अमेरिकेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 12:49 PM2022-08-09T12:49:47+5:302022-08-09T12:50:37+5:30
डिसले गुरुजींनी आपल्या जिल्हा परिषदेतल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. आठ ऑगस्ट त्यांचा नोटीस पिरियड संपणार होता.
सोलापूर : ग्लोबल टिचर अवार्ड विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी हे आज सकाळी अमेरिकेला रवाना झाले. अमेरिकेला जाण्यापुर्वी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यपालांनी डिसले गुरुजींना शुभेच्छा दिल्या.
डिसले गुरुजींनी आपल्या जिल्हा परिषदेतल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. आठ ऑगस्ट त्यांचा नोटीस पिरियड संपणार होता. मात्र, त्या आधीच जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांचा राजीनामा नामंजूर केला. डिसले गुरुजींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर 18 दिवसात प्रशासनाने राजीनामा नामंजूर केला.
डिसले गुरुजी यांनी यापूर्वीच अमेरिकेच्या फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी जाण्याची तयारी केली होती. अमेरिकेला जाण्यापुर्वी ते माध्यमांशी संवाद साधणार होते. मात्र, त्यांचा राजीनामा नामंजूर झाल्याने त्यांच्यासमोरील संकट टळले. अमेरिकन सरकारची प्रतिष्ठीत फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. या स्कॉलरशिपद्वारे ते सहा महिने अमेरिकेत राहून संशोधन करणार आहेत.