सरनाईकांवर खंडणीचा गुन्हा
By admin | Published: November 1, 2014 12:52 AM2014-11-01T00:52:31+5:302014-11-01T00:52:31+5:30
ओवळा माजीवडयाचे भाजपाचे पराभूत उमेदवार संजय पांडे यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 20 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे.
Next
वीस कोटींची मागणी : भाजपाच्या संजय पांडेने केली तक्रार दाखल
ठाणो : एकीकडे शिवसेनेला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळते की नाही मिळते, अशी अवस्था असतांनाच ठाण्यात मात्र ओवळा माजीवडयाचे भाजपाचे पराभूत उमेदवार संजय पांडे यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 2क् कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे. सरनाईकांनी आपल्या कार्यालयात शिरुन ही खंडणी मागितल्याचा आरोप पांडे यांनी वर्तकनगर पोलिसांकडे नोंदविलेल्या फिर्यादीमध्ये केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ओवळा-माजीवडा मतदारसंघातून पांडे यांना पराभूत करुन सरनाईक विजयी झाले आहेत. त्यांनी अगदी 2क् व्या फेरीपर्यन्त आ. सरनाईकांना चांगलीच टक्कर दिली. पांडे यांच्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता सरनाईक हे आपल्या 1क् ते 12 सहका:यांसह पोखरण रोड येथील ‘महाकाली डेव्हलपर्स’च्या कार्यालयात आले. तिथे त्यांनी पांडे यांचे व्यवस्थापक ओमप्रकाश शर्मा यांना, ‘तुझा संजय पांडे साहेब हा माङयाविरोधात निवडणूकीत उभा होता, म्हणून मला सहज विजय मिळाला नाही. निवडणूक जिंकण्यासाठी मला 2क् कोटींचा जास्त खर्च करावा लागला. तुङया शेठला मला 2क् कोटी द्यायला सांग. नाहीतर मी त्याचे जगणो मुश्किल करुन टाकेन व त्याला बरबाद करेन,’ अशी धमकी दिली. या प्रकरणी भादंवि 447 , 448, 383,387 ,34 अन्वये सरनाईक यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
च्आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात पांडे यांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. ती अनधिकृत बांधकामे महापालिकेने तोडू नयेत. त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई होऊ नये. यासाठी दबावतंत्रचा वापर करण्यासाठीच त्यांनी हा खोटा गुन्हा दाखल केला आहे.
च्खंडणी मागण्यासाठी कोणी महापालिकेचे अधिकारी, वास्तुविशारद यांना बरोबर घेऊन दिवसाढवळया जात नाही. जर यात तथ्य आढळले तर माङयावर कारवाई व्हावी, अन्यथा खोटा गुन्हा नोंदविणा:यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपण पोलिस आयुक्त विजय कांबळे यांच्याकडे केल्याचेही सरनाईक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.