शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी, राज ठाकरेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 07:09 AM2022-04-11T07:09:53+5:302022-04-11T07:10:23+5:30
राज्यात भाजप आणि शिवसेनेचे राज्य आले होते. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे सर्वच नेते व्यासपीठावरून जाहीरपणे सांगायचे. त्यामुळे लोकांनी आम्हाला मते दिली.
मुंबई :
राज्यात भाजप आणि शिवसेनेचे राज्य आले होते. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे सर्वच नेते व्यासपीठावरून जाहीरपणे सांगायचे. त्यामुळे लोकांनी आम्हाला मते दिली. पण, यांनी दिवसाढवळ्या दगाफटका केला. सत्ता गेल्याचे नाही, तर धोका दिल्याचे दु:ख आहे, अशी भावना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी व्यक्त केली. तसेच शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी असल्याचा आरोप केला.
रावसाहेब दानवे यांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी आज पहाटेचा शपथविधी, शिवसेना, मनसे आणि हिंदुत्व, आदी मुद्द्यांवर भाष्य केले.
राज ठाकरे आमच्या बाजूने बोलले तर त्यांच्या पोटात दुखते. आमच्या विरोधात बोलले, मोदींवर टीका केली तर त्यांना आनंद होतो. यांच्याविरोधात बोलले आणि राग आला तर समजण्यासारखे आहे. पण, तसेही काही झाले नाही, असेही म्हणाले.