'आज वाईन विकायला लागलेत, उद्या बियर विकतील', रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 05:35 PM2022-01-29T17:35:49+5:302022-01-29T17:37:53+5:30
राज्य सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. यात आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्य सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. यात आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ''राज्य सरकारमध्ये काय चाललंय हे सरकार मधल्यांनाही कळत नाही आणि जनतेलाही कळत नाही. आज वाईन विकायला चाललेत. उद्या बियर विकतील, पुढे दारू विकायला लागतील", असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.
"राज्यातील काही जिल्हे आम्ही दारूमुक्त केले होते. चंद्रपूरमध्येही आम्ही दारूबंदी केली. हे सरकार सत्तेवर आलं नाही तोवर दारुविक्री पुन्हा सुरू झाली. आता केवळ चंद्रपूरला दारू सुरू करून थांबले नाहीत. आतातर सगळ्या महाराष्ट्रात पानटपरीवर वाईन विकायला लागलेत", असं रावसाहेब दानवे म्हणाले.
आज वाईन विकत आहेत. उद्या बियर विकतील, पुढे दारु विकायलाही सुरुवात करतील. या सरकारला उत्पन्न पाहिजे असेल तर उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक मार्ग आङेत. पानटपरीवर दारू विकून किंवा दुकानात दारू विकून पैसा उभं करणं हे योग्य नाही. महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी देखील रावसाहेब दानवे यांनी यावेळी केली आहे.
आमच्या सरकारने कोणत्याही राज्यात दारू विक्रीचा निर्णय घेतलेला नाही आणि घेणारही नाही असं म्हणत दानवेंनी भाजपाशासित इतर राज्यांमध्ये वाईन विक्री होत असल्याच्या टीकेला प्रत्युत्तर देखील दिलं आहे.