रावसाहेब दानवेंविरोधात गुन्हा दाखल

By admin | Published: December 29, 2016 07:19 AM2016-12-29T07:19:06+5:302016-12-29T10:39:15+5:30

वादग्रस्त विधान करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Raosaheb filed a criminal case against the demon | रावसाहेब दानवेंविरोधात गुन्हा दाखल

रावसाहेब दानवेंविरोधात गुन्हा दाखल

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 29 - निवडणूक प्रचारा दरम्यान मतदारांनी लक्ष्मीदर्शनाचा लाभ घ्यावा असे वादग्रस्त विधान करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पैठण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावसाहेब दानवे यांचे विधान अचारसंहिता भंग करणारे असल्याने त्यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदवा असा राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद जिल्हाधिका-यांना आदेश दिला होता. 
 
मतदानाच्या आदल्या दिवशी तुमच्या दारी लक्ष्मी आली तर त्यास नकार देऊ नका, तिचा स्वीकार करा असे वादग्रस्त वक्तव्य दानवे यांनी नगरपरिषदा निवडणूक प्रचारा दरम्यान पैठणमध्ये केले होते. दानवे हे राज्यातील सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. 
 
त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. निवडणूक आयोगानेही तक्रारीची दखल घेत रावसाहेब दानवेंना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावर दानवे यांनी केलेला खुलासा न पटल्याने निवडणूक आयोगाने एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला. 

Web Title: Raosaheb filed a criminal case against the demon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.