प्रियकराविरोधात बलात्कारचा गुन्हा
By Admin | Published: October 19, 2016 09:36 PM2016-10-19T21:36:26+5:302016-10-19T21:36:26+5:30
२००८ साली झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले . लग्नाचे अमिष दाखवून त्याने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. आठ वर्षाच्या कालावधीत त्याने केवळ तिचे लैंगिक
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 19 - २००८ साली झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले . लग्नाचे अमिष दाखवून त्याने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. आठ वर्षाच्या कालावधीत त्याने केवळ तिचे लैंगिक शोषणच केले नाही तर तिच्याकडील रोख २ लाख रुपये आणि ५० हजार रुपये किंमतीचे दागिनेही वेगवेगळी काररणे सांगून नेली. आता तिच्याजवळ एक छदामही नसल्याचे लक्षात येताच त्याने तिच्याकडे पाठ फिरवली आणि लग्नास नकार दिला. या विश्वासघातकी प्रियकराविरोधात अखेर तिने मुकुंदवाडी ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
अनिल हिरालाल मगरे (रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल आढे यांनी सांगितले की, पीडित ३१ वर्षीय महिला आणि आरोपी यांच्यात २००८ मध्ये ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांच्या गाठीभेटी वाढल्याने आरोपीने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तब्बल आठ वर्ष पीडितेसोबत त्याचे संबंध होते. पीडिता घटस्फोटित असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. आरोपीही विवाहित असून तो मुकुंदवाडी परिसरात आईवडिल आणि बहिणीसह राहतो. तोही पत्नीपासून वेगळा राहतो. त्याने खर्चासाठी आणि वेगवेगळ्या कारणासाठी पीडितेकडून वेळोवेळी २ लाख रुपये नेले. तिच्या गळ्यातील ५० हजाराचे दागिनेही नेले. तिच्याकडून लग्नासाठी आग्रह वाढू लागताच त्याने तिच्याकडे जाणे कमी केले. काही दिवसापूर्वी त्याने तिला चक्क वेश्या व्यवसायच करण्याचा सल्ला दिला. आपला प्रियकरच देह विक्रय करण्याचे सांगत असल्याने ती संतप्त झाली. यावरुन त्यांच्यात भांडण झाले. तेव्हा त्याने तिला आणि तिच्या मुलीलाही मारहाण केली.
पोलीस आयुक्तांकडे धाव
मुकुंदवाडी पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून सोमवारी ती थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटली. तिने तिच्यावर ओढावलेला प्रसंग त्यांना सांगितला. त्यानंतर आयुक्तांनी महिला पोलीस उपनिरीक्षकास बोलावून महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. महिला पोलीस उपनिरीक्षकाने तिच्याकडून सविस्तर फिर्याद नोंदवून घेतली. १८ आॅक्टोबर रोजी रात्री उशीरा मुकुंदवाडी ठाण्यात आरोपी अनिल मगरे विरूद्ध बलात्कार करणे, मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला.