दलित महिलेवर बलात्कार, दहा वर्षाची सक्तमजुरी

By Admin | Published: July 25, 2016 07:18 PM2016-07-25T19:18:13+5:302016-07-25T19:18:13+5:30

बांधकाम मिस्त्रीच्या हात खाली काम करणा-या मजुराने घरात घुसुन विवाहित दलित महिलेवर धमकी देत बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवत अंबाजोगाईचे जिल्हा सत्र न्यायधीश

Rape of Dalit woman, 10 years of forced labor | दलित महिलेवर बलात्कार, दहा वर्षाची सक्तमजुरी

दलित महिलेवर बलात्कार, दहा वर्षाची सक्तमजुरी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २५ : बांधकाम मिस्त्रीच्या हात खाली काम करणा-या मजुराने घरात घुसुन विवाहित दलित महिलेवर धमकी देत बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवत अंबाजोगाईचे जिल्हा सत्र न्यायधीश एन. एस. कोले यांनी आरोपीस पाच कलमा खाली दहा वर्षाची सक्तमजुरी व साडे चौदा हजाराचा दंड ठोठावला. 

शहरातील मंगळवार पेठ भागातील बांधकाम मिस्त्री बाहेर गावी गेल्याचे पाहुन त्याच्या हाताखाली काम करणा-या मजुराने मिस्त्रीच्या घरात घुसुन त्याच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. ही घटना २२ मे २०१५ रात्री अडीच वाजता घडली होती. पहाटेच्या सुमारास पती आल्यावर घरात हा प्रकार सुरु असल्याचे त्याच्यालक्षात आले. यानंतर पतीने त्याला आडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी रामदास नागनाथ हुलगुंडे याने झटका देऊन पळून गेला.

याप्रकरणी शहर ठाण्यात दलित पिढीत महीलेच्या तक्रारीवरुन बेकायदा घरात घुसने, महिलेस मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बळजबरीने अत्याचार करणे व जाती वाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपअधिक्षक एम. आय. शेख यांनी तपास करुन दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एन. एस. कोले यांच्या समोर सुनावणीसाठी आले. सरकार पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले.

सरकार पक्षाणे सर्व कलमाचा पुरावा देत आरोप शिध्द केल्यामुळे व पिढीत महिलेचा जवाब, वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरुन न्या. एन. एस. कोले यांनी आरोपी रामदास हुलगुंडे याला दोषी ठरवुन पाच कलमा खाली दहा वर्षे सक्तमजुरी व साडे चौदा हजाराचा दंड ठोठावला. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड.लक्षमन फड यांनी काम पाहीले तर त्यांना अ‍ॅड. एन.डी. शिंदे यांनी सहकार्य केले.

Web Title: Rape of Dalit woman, 10 years of forced labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.