सिम्बॉयसिसच्या विद्यार्थिनीवर हनुमान टेकडीवर बलात्कार

By Admin | Published: February 26, 2016 12:06 PM2016-02-26T12:06:07+5:302016-02-26T13:18:19+5:30

पुण्यातील प्रसिद्ध सिम्बॉयसिस कॉलेजच्या विद्यार्थिनीला हनुमान टेकडी येथे लुटून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

Rape of Hanuman Tee on Symbiosis's student girl | सिम्बॉयसिसच्या विद्यार्थिनीवर हनुमान टेकडीवर बलात्कार

सिम्बॉयसिसच्या विद्यार्थिनीवर हनुमान टेकडीवर बलात्कार

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २६ - जिममध्ये व्यायाम केल्यानंतर हनुमान टेकडीवर जाऊन पुस्तक वाचत बसलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.  बलात्कारानंतर आरोपीने तिची पर्स हिसकावून नेली. चतुश्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ निरीक्षक अरुण सावन्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे वय 19 वर्ष असून ती मूळची पश्चिम बंगालची आहे. 
बुधवारी संध्याकाळी ती जिममध्ये व्यायाम करून हनुमान टेकडीवर गेली होती. तेथे झाडाखाली पुस्तक वाचत बसलेली असतानाच पाठीमागून एकजण आला. त्याने तिला पकडून ठेवत पैशांची मागणी केली. तिने घाबरून पर्स त्याचाकडे दिली. मात्र त्याने या मुलीला धाक दाखवत टेकडीच्या मागील बाजूस असलेल्या उताराकडे नेले. तेथे तिच्याशी अश्लील वर्तन करून हा आरोपी पर्स घेऊन पसार झाला. घाबरलेली तरूणी गुरुवारी रात्री डेक्कन पोलीस ठाण्यात गेली. डेक्कन पोलिसानी तिला चतुःशृंगी पोलीस ठाण्यात पाठवले. तिची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
उपायुक्त बसवराज तेली, तुषार दोषी, वरिष्ठ निरीक्षक अरुण सावन्त यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे तपास सुरु आहे.
पुणे शहरातील एक महत्वाचे ठिकाण असलेल्या या हनुमान टेकडी येथे सकाळ-संध्याकाळ अनेक पुणेकर वॉकसाठी येत असतात. मात्र त्याच टेकडीवर हा भीषण प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ माजली असून रहिवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

 

Web Title: Rape of Hanuman Tee on Symbiosis's student girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.