मुलीचे अपहरण करून बलात्कार

By admin | Published: July 18, 2016 01:21 AM2016-07-18T01:21:27+5:302016-07-18T01:21:27+5:30

महाविद्यालयात जात असताना गुंगीचे औषध देऊन १७ वर्षीय युवतीचे अपहरण करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली

Rape of kidnapping daughter | मुलीचे अपहरण करून बलात्कार

मुलीचे अपहरण करून बलात्कार

Next


पुणे : महाविद्यालयात जात असताना गुंगीचे औषध देऊन १७ वर्षीय युवतीचे अपहरण करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली आहे. पोलिसांनी दोघा जणांना बेड्या ठोकल्या असून मुलीवर उपचार करण्यात आले आहेत.
चेतन सोमनाथ शिरोळे (रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर) मिलिंद शिवानंद बनसोडे (दोघेही वय २१, रा. रामटेकवाडी, हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी एकाच भागात राहण्यास आहेत.
तरुणी गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास हडपसरमधील गाडीतळ रस्त्याने महाविद्यालयाकडे जात होती. त्या वेळी आरोपींनी तिच्या दुचाकीला पाठीमागून धडक मारली. त्यानंतर तिला पाणी देण्याचे नाटक करीत त्यामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर स्वत:च्या गाडीवर बसवून सासवड रस्त्यावर नेले. सासवड येथील एका खोलीमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला.
पीडित मुलगी दुसऱ्या दिवशी घरी सकाळी घरी आल्यानंतर हा प्रकार तिने आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस
आली. पीडित तरुणीचे
कुटुंब वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास आहे. त्यांनी प्रथम वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, घटना गाडीतळ
परिसरात घडली असल्याने हा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
>अहमदनगरमधील कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना पुण्यात हडपसरमध्येही अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Rape of kidnapping daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.