गतिमंद मुलीचे अपहरण करून बलात्कार

By admin | Published: November 4, 2016 05:21 AM2016-11-04T05:21:18+5:302016-11-04T05:21:18+5:30

१७ वर्षाच्या अल्पवयीन गतिमंद मुलीचे अपहरण करुन बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मालाड येथील मार्वे परिसरात घडली

Rape by kidnapping of a speeding girl | गतिमंद मुलीचे अपहरण करून बलात्कार

गतिमंद मुलीचे अपहरण करून बलात्कार

Next


मुंबई : जोगेश्वरी येथे सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच एका १७ वर्षाच्या अल्पवयीन गतिमंद मुलीचे अपहरण करुन बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मालाड येथील मार्वे परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिच्या दोघा मावस भावांसह पाच जणांना दिंडोशी पोलिसांनी अटक असून हे सर्वजण एकाच परिसरातील आहेत. या नराधमांनी सात दिवस अत्याचार करून या मुलीला मार्वे बीचवर सोडून दिले होते, पीडित तरुणी ११ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय चाचणीतून उघड झाले असून या पूर्वीही तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे दिंडोशी पोलिसांकडून सांगण्यात आले.
आरोपींमध्ये एक अल्पवयीन मुलगा असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मालाड पूर्वेला चिंचोली फाटक परिसरात आईसोबत ही मुलगी राहात होती. तिची आई धुणीभांड्याचे काम करत असल्याने मुलगी दिवसभर घरी एकटीच असायची. २१ आॅक्टोबर रोजी ती घरातून बेपत्ता झाली. परिसरात व नातेवाईकांकडे शोधूनही ती न सापडल्याने तिच्या आईने दिंडोशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिला परिसरातील काही जण घेऊन गेल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. २८ आॅक्टोबरला ती मार्वे बीचवर आढळली. वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. तसे ती ११ आठवड्यांची गर्भवती असल्याचेही उघड झाल्याने या पूर्वीही तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने परिसरातील ५ जणांची नावे सांगितली. त्यामध्ये दोघेजण तिचे मावस भाऊ होते, तर एकजण रिक्षाचालक होता. ते पूर्वीपासून तिला मार्वे येथील रिसॉर्टमध्ये घेऊन जात असल्याचेही चौकशीत समोर आले. त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता चौघांना ७ आॅक्टोबरपर्यत पोलीस कोठडी मिळाली तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले.
>कॉटेज चालकावर कारवाईची मागणी
मार्वे परिसरातील अनेक लॉज आणि कॉटेजमध्ये अश्लील चाळे चालत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे या मुलीला कॉटेजमध्ये आठ दिवस कोंडल्याची बाब उघड झाली नाही.
मुख्य म्हणजे कॉटेज आणि लॉजमध्ये येणाऱ्यांचे ओळखपत्र तपासणे चालक आणि मालकांना बंधनकारक आहे, तरीदेखील त्याकडे ते दुर्लक्ष करतात. जर या मुलीबाबत वेळीच चौकशी केली असती, तर अत्याचारापासून ती बचावली असती. त्यामुळे संबंधित कॉटेज चालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Rape by kidnapping of a speeding girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.