नोकरीचे आमिष दाखवून सालीवर बलात्कार

By Admin | Published: June 14, 2017 08:03 PM2017-06-14T20:03:30+5:302017-06-14T20:34:39+5:30

बँकेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून २० वर्षीय सालीला पुणे येथे नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधम मेहुण्याला चिकलठाणा पोलिसांनी

Rape rape by showing bait for job | नोकरीचे आमिष दाखवून सालीवर बलात्कार

नोकरीचे आमिष दाखवून सालीवर बलात्कार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि, 14 - बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २० वर्षीय सालीला पुणे येथे नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधम मेहुण्याला चिकलठाणा पोलिसांनी २४ तासांत अटक केली. विशेष म्हणजे या प्रकाराची कोणालाही माहिती दिल्यास तुझ्या
बहिणीला सोडून देईन अशी, धमकीही त्याने पीडितेला दिली होती.
शांतीलाल गोरक्ष खताळ (रा. माळीवाडी, ता. शिवूर, जि. बीड)असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मेहुण्याचे नाव आहे.सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी याविषयी सांगितले की, आडगाव येथील रहिवासी २० वर्षीय पिडीता सध्या सिडको परिसरातील एका महाविद्यालयात बी.कॉम.चे शिक्षण घेते. तिच्या मोठ्या बहिणीचा विवाह माळीवाडी (ताशिऊर जि. बीड) येथील शांतीलाल खताळ याच्या सोबत विवाह झाला आहे. तो सध्या पुण्यातील हडपसर येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहे. पीडितेची बहिणही याच ठिकाणी खासगी नोकरी करते. १९ एप्रिल रोजी पीडितेच्या बहिणीला आरोपीने माळीवाडी या गावी नेऊन सोडले. त्यानंतर तो कार घेऊन औरंगाबादला आला. आरोपी हा पीडितेच्या कायम संपर्कात होते. तो तिला तुझे बी. कॉम. पर्यंत शिक्षण सुरू आहे. तुला पुणे येथील बँकेत नोकरी लावतो,असे अमिष दाखवित असत. १९ एप्रिल रोजी त्याने तिला पुण्यात तुला नोकरीला लावून देतो, असे सांगून गावाजवळील फाट्यावर बोलावून घेतले. सख्या मेहुणाच आहे. आणि पुणे येथे बहिणीच्याच घरी जायचे असल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. पुणे येथे नेल्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. २६ एप्रिलपर्यंत त्याचे हे कृत्य सुरू होते. विशेष म्हणजे ही बाब कोणाला ससांगितल्यास तुझी बदनामी होईल आणि पोलिसांत तक्रार दिल्यास तुझ्या बहिणीला मी सोडून देईन,धमकी त्याने दिली. या नंतर पीडिता गावी
परतली. दरम्यान तो सतत पीडितेला फोन करून त्रास देत असत. आरोपीच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने १२ जून रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात मेहुण्यांविरूद्ध फिर्याद नोंदविली. सहाय्यक पोलिस निरिक्षक ताईतवाले यांनी घटनेची गांभीर्य
ओळखून एक पथक पुण्याला रवाना केले. पोलिसांच्या पथकाने २४ तासात आरोपी खताळ यास बेड्या ठोक ल्या. महिला पोलिस उपनिरिक्षक राठोड पुढील तपास करत आहेत.

Web Title: Rape rape by showing bait for job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.