बीडमध्ये बलात्कार पीडित युवतीची आत्महत्या
By Admin | Published: May 10, 2014 10:08 PM2014-05-10T22:08:03+5:302014-05-10T23:31:24+5:30
तालुक्यातील जवळबन येथील अश्विनी प्रभू वैरागे (१७) या बलात्कार पीडित युवतीने निराश होऊन आत्महत्या केली.
केज(जि.बीड): तालुक्यातील जवळबन येथील अश्विनी प्रभू वैरागे (१७) या बलात्कार पीडित युवतीने निराश होऊन आत्महत्या केली.
गावातीलच एका नराधमाने वर्षभरापूर्वी तिच्यावर अत्याचार केला होता़ त्यानंतर युसूफ वडगाव ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती़ घटनेनंतर नराधमाला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या होत्या़ या घटनेपासून अश्विनी निराश झाली होती़ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घरातील आडूला दोरीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली़ बहुजन विकास मंचचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी पीडित युवतीच्या आत्महत्येस नराधम जबाबदार आहे़ दलितांवरील वाढते अत्याचार चिंताजनक आहेत़ बीड व अहमदनगर हे जिल्हे दलित अत्याचारगस्त म्हणून जाहीर करावेत़ तसेच विशेष पथकामार्फत तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली़