बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीचीच शिक्षा पाहिजे
By Admin | Published: September 14, 2016 12:32 AM2016-09-14T00:32:36+5:302016-09-14T00:32:36+5:30
महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत. बलात्कार करणाऱ्या नराधमांना दयामाया दाखवता काम नये, त्यांना फाशीच शिक्षा दिली पाहिजे
भोसरी : महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत. बलात्कार करणाऱ्या नराधमांना दयामाया दाखवता काम नये, त्यांना फाशीच शिक्षा दिली पाहिजे, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भोसरी येथे व्यक्त केले.
कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात भोसरी कला क्रीड़ा मंच आयोजित भोसरी महोत्सवात ते बोलत होते. या वेळी महापौर शकुंतला धराडे, अभिनेता सिद्धार्थ जाधव, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, संयोजक अॅड. नितीन लांडगे, इंद्रमन सिंह, नगरसेवक वसंत लोंढे, संजय वाबळे, नगरसेविका सुरेखा गव्हाणे, शुभांगी लोंढे, सुनंदा फुगे, भरत लांडगे, संदीप राक्षे, राजेंद्र सिंह, भाऊसाहेब डोळस आदी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, ‘‘भोसरीने शहरपण स्वीकारताना अस्सल गावपणाचा बाज टिकवून ठेवला आहे, तसेच आध्यात्मिक, सांस्कृतिक क्रीडा क्षेत्राची परंपरा जोपासताना सर्व धर्मांचा व जातीचा एकात्मिक गौरव भोसरीने केल्याचा अभिमान आहे. बलात्काराच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या घटना मन पिळवटून टाकणाऱ्या आहेत.’’
आमदार लांडगे म्हणाले, ‘‘भोसरीतील नागरिकांचे उदंड प्रेम कायम मिळाले आहे, तसेच त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच ध्येय जोपसणार आहे.’’या वेळी विजय फुगे यांनी प्रास्ताविक केले. किरण लांडगे यांनी आभार मानले. (वार्ताहर)