महिलेवर पाणीपुरी विक्रेत्याचा बलात्कार

By Admin | Published: September 11, 2016 03:29 PM2016-09-11T15:29:24+5:302016-09-11T15:29:24+5:30

घराशेजारी राहणा-या एका मजूराच्या पत्नीवर पाणीपुरी विक्रेत्याने बलात्कार केल्याची घटना सातारा परिसरात ९ सप्टेंबरच्या रात्री घडली.

The rape of a white-seller on the woman | महिलेवर पाणीपुरी विक्रेत्याचा बलात्कार

महिलेवर पाणीपुरी विक्रेत्याचा बलात्कार

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ११ -  घराशेजारी राहणा-या एका मजूराच्या पत्नीवर पाणीपुरी विक्रेत्याने बलात्कार केल्याची घटना सातारा परिसरात ९ सप्टेंबरच्या रात्री घडली. याप्रकरणाची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
विक्रमसिंग मलखानसिंग (२५,मूळ रा. उत्तरप्रदेश,ह.मुक्काम, सातारा परिसर)असे आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक भारत काकडे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आरोपी आणि पीडिता हे उत्तरप्रदेशातील  रहिवासी आहेत. 
 
आरोपी हा पाणी पुरीचा व्यवसाय करतो तर पीडितेचा पती मजूरी करतो. आरोपी हा एकटाच येथे राहतो. ९ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पीडितेचा पती नाईट ड्युटीसाठी बाहेर होता. पीडिता तिच्या बाळाला झोपवित होती. यावेळी आरोपी तेथे आला. 
 
आरोपीने तिला आणि तिच्या बाळाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो तेथून निघून गेला. विशेष म्हणजे, पीडितेची त्याने दोन दिवसापूर्वी छेड काढली होती. तेव्हाही पीडितेने त्यास पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली होती. 
 
त्यानंतरही आरोपीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि त्याने हे घृणास्पद कृत्य केले. याप्रकरणी पीडितेने सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस निरीक्षक काकडे यांनी सांगितले.

Web Title: The rape of a white-seller on the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.