महाडमध्ये तरुणीवर बलात्कार

By admin | Published: July 12, 2017 02:53 AM2017-07-12T02:53:03+5:302017-07-12T02:53:03+5:30

तरुणीबरोबर मैत्री करून, तिच्यावर बलात्कार करणाऱ्यासह त्यास मदत करणाऱ्यास अशा दोन तरुणांना महाड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.

Rape of a woman in Mahad | महाडमध्ये तरुणीवर बलात्कार

महाडमध्ये तरुणीवर बलात्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : एका तरुणीबरोबर मैत्री करून, तिच्यावर बलात्कार करणाऱ्यासह त्यास मदत करणाऱ्यास अशा दोन तरुणांना महाड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक उद्योजकाचा मुलगा असून, दुसरा त्याचा पुतण्या आहे.
शंतनू लक्ष्मण निंबाळकर आणि अमोल निंबाळकर अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. यातील शंतनू निंबाळकर याने या पीडित तरुणीबरोबर मैत्रीचे नाटक केले आणि त्याचा गैरफायदा घेत शहरालगतच्या महामार्गावरील एका इमारतीमधील रूममध्ये तिच्यावर १ जानेवारी २०१७ रोजी बलात्कार केला. त्यानंतर तू वेश्या व्यवसाय करतेस, माझ्याकडे पैशाची मागणी करतेस असा प्रचार करून बदनामी करण्याची धमकी देत १ जानेवारी ते १० जुलै या कालावधीत विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
१० जुलै रोजी सायंकाळी पीडित तरुणीने या प्रकरणी महाड शहर पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी शंतनू निंबाळकरच्या विरोधात गुन्हा दाखल करून सोमवारी रात्रीच त्याला अटक केली. या प्रकरणात त्याने वापरलेल्या तीन आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस चौकशीमध्ये शंतनू निंबाळकर याचा चुलतभाऊ अमोल रामदास निंबाळकर यानेही या तरुणीला दमदाटी करून शंतनूला मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक केली आहे. डीवायएसपी प्रांजली सोनावणे, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी पुढील तपास करीत आहेत.
>घरातून के ली अटक
सोमवारी रात्री शंतनू लक्ष्मण निंबाळकर आणि अमोल निंबाळकर हे दोघे पलायन करण्याआधीच महाड शहर पोलिसांनी दोघांना त्यांच्या नातेखिंड येथील घरातून अटक केली. डीवायएसपी प्रांजली सोनावणेंच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Web Title: Rape of a woman in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.