नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

By admin | Published: September 6, 2016 02:27 PM2016-09-06T14:27:05+5:302016-09-06T14:27:05+5:30

२० वर्षीय युवतीस मोठी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत उदगीरातील दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Rape of a woman by showing bait for job | नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. ६ -  एका खाजगी रुग्णालयात नोकरी करणा-या २० वर्षीय युवतीस मोठी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत उदगीरातील दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी पहाटे उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
उदगीरच्या उदय कॉलनी भागात राहणा-या एका २० वर्षीय युवतीस याच भागात राहणा-या बालाजी पाटील व पंडीत बिरादार या दोघांनी मोठी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी या आरोपींनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणीही केली होती.
मात्र, त्या युवतीने शरीरसुखास विरोध केल्याने आरोपींनी तिला बाहेर नेवून अत्याचार करण्याचे ठरविले. त्यानुसार २१ ऑगस्ट रोजी युवतीस तिच्या नोकरीसंदर्भात एका साहेबास भेटण्यासाठी जायचे आहे, असे सांगून तिला एमएच २४ सी ३३३७ क्रमांकाच्या कारमधून नांदेड रोडवरील साखर कारखान्याच्या पलिकडच्या जंगलात नेले. 
 
तेथे तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. शिवाय जीवे मारण्याची धमकीदेत दोन्ही आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला़ याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी पहाटे उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
बालाजी पाटील या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, दुसरा आरोपी पंडीत बिरादार फरार आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील कारही जप्त केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ मुलानी करीत आहेत़
 
बलात्काराचा व्हीडिओ?
पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपींनी घटनेचा व्हीडिओ बनविल्याचे सांगतिले आहे. या व्हीडिओद्वारे ते ब्लॅकमेलिंग करीत असल्याचा दावाही तिने जबाबात केला आहे. सध्या अटक असलेल्या आरोपीकडून व्हीडिओबाबतची ठोस माहिती मिळाली नाही. मुख्य आरोपी पंडीत बिरादार हाती लागल्यानंतर याचा खुलासा होवू शकेल, असे तपास अधिकारी अल्ताफ मुलानी यांनी सांगितले.

Web Title: Rape of a woman by showing bait for job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.