भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Published: May 14, 2015 01:49 AM2015-05-14T01:49:57+5:302015-05-14T01:49:57+5:30

आळंदी येथील एका कथित महाराजाने मोजे रिसे (ता. पुरंदर) येथील एका शाळेत १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Rape of a young girl in a bizarre neighborhood | भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Next

जेजुरी (जि. पुणे) : आळंदी येथील एका कथित महाराजाने मोजे रिसे (ता. पुरंदर) येथील एका शाळेत १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ह.भ.प. अनिल सूर्यकांत हांडे (महाराज) याने ९ मेपासून स्वत:चे मूळ गाव रिसे येथील एका शाळेत ११०० रुपयांत प्रशिक्षण, राहण्याची सोय आदीसह २५ दिवसांचे बाल संस्कार शिबीर आयोजित केले होते. त्याने स्वत:ला मृदंग विशारद, कीर्तनकार असल्याची जाहिरात केली. त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यातून व परजिल्ह्यातील मुले-मुली शिबिरात सहभागी झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील चवथीत शिकणारी १० वर्षांची पीडित मुलगीही या शिबिरात सहभागी झालेली होती.
मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास या अल्पवयीन मुलीला महाराजाने स्वत:च्या खोलीत बोलावले. ओरडू नये म्हणून तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला.

Web Title: Rape of a young girl in a bizarre neighborhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.