रॅपलिंग अन् बोटिंग बेततेय मुलांच्या जिवावर

By admin | Published: May 14, 2017 02:22 AM2017-05-14T02:22:06+5:302017-05-14T02:22:06+5:30

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हांळी सुटीमध्ये शाळेतील इतर १२० मुलांबराबर सजन येथील नेचर टॅल्स येथे आला होता

Rappelling and Boating | रॅपलिंग अन् बोटिंग बेततेय मुलांच्या जिवावर

रॅपलिंग अन् बोटिंग बेततेय मुलांच्या जिवावर

Next

राहुल वाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : मुंबई येथे राहणारा १३ वर्षीय बालक मनन केकीन गोगरी हा तरुण मित्र मंडळ मुंबईच्या टीमसोबत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हांळी सुटीमध्ये शाळेतील इतर १२० मुलांबराबर सजन येथील नेचर टॅल्स येथे आला होता. दुसऱ्या दिवशी यातील ६० मुलांना घेऊन नेचल टॅल्सची अ‍ॅक्टीव्हीटी टिम चिंचपाडा डॅम (मोह लघु पाटबंधारे) येथे पोहण्या करीता घेऊन आले होते. मात्र, येथील खोल पाणी व मुलांना पोहता येत नव्हते या पार्श्वभूमीवर मनन याने लाईफ जॅकेट मालेली उडी त्याच्या जिवावर बेतली. येथील मोहखुर्द बंधाऱ्यामध्ये घडली असल्याने या पाट बंधऱ्याचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे.
उन्हाळ्याची सुट्टी लागली की, मुंबई, ठाणे या भागतून मुलांना घेऊन अ‍ॅक्टीव्हिटी टिम या लघु पाटबंधाऱ्यावर रॅप्लिंग आणि बोटिंगसाठी शासनाची परवानगी न घेता येत असतात. त्यात हा बंधारा दोन टेकड्यांचा मध्ये असल्याने खूप खोल, उंच सखल असल्याने स्थानिक लोक ही या भागात पोहायला जात नाही. मात्र, काही अ‍ॅक्टीव्हिटी टिम कुठली ही सुरक्षा किंवा माहितगाराना सोबत न घेता रॅप्लिंग आणि बोटिंग करत असल्याचे येथील स्थानिकाचे म्हणे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पालक सुद्धा या अ‍ॅक्टिव्हिटी क्लब कडे कोणतीही चौकशी करीत नाही. त्यांच्या कार्यालयाचा कॉर्पोरेट लूक पाहून आपल्या मुलांना त्यांच्या ताब्यात देण्याच्या प्रकारातून अपघात वाढले आहेत.
या बंधाऱ्यात मुबलक पाणी व निसर्गसंपदा लाभलेली असल्याने या ठिकाणी काही खाजगी व्यावसायिकांनी बोटिंग व बंधाऱ्याच्या भिंतीला ट्रेकिंग करण्याचे व्यवसाय सुरु केले आहेत. खरंतर या व्यावसायिकांना कुणी परवानगीदिली व त्यांच्याकडून काही उत्पन्न मिळते का? असा प्रश्न उपस्थित होत असून या ठिकाणी वनविभागाने जर ही व्यवस्था उपलब्ध करून दिली तर त्याचा शासनाला नक्कीच फायदा होईल असा ही एक मत प्रवाह आहे.

>नॅचरल ट्रॉल्सला या पूर्वी २०१२ या वर्षी बोटिंगसाठी नियम व शर्तीच्या आधिन राहून परवानगी दिली होती. तसा करार सुद्धा करण्यात आला होता. त्यावेळी याचा जबाबदारी रवी गावकवाड या अभियंत्यावर होती. जानेवारीपासून या प्रकल्पाची जबाबदारी माझ्याकडे आहे. मी कराराची प्रत मागविली आहे. तसेच सुरक्षे संदर्भात काय उपाय योजना केल्या होत्या याचा लेखी खुलासा सुद्धा मागविला आहे. - एन. एस. दुसाणे, कार्यकारी अभियंता, (पाटबंधारे विभाग, मनोर)

Web Title: Rappelling and Boating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.