टिटवाळ्यात सापडला दुर्मिळ ब्लॅक कोब्रा

By admin | Published: October 22, 2016 06:21 PM2016-10-22T18:21:11+5:302016-10-22T18:21:11+5:30

टिटवाळ्यात एका घरातून ब्लॅक कोब्रा पकडण्यात आला आहे. सर्पमित्र राहूल साळवे याने आपल्या मित्रांसोबत हा विषारी साप पकडला आहे

Rare black cobbler found in a tray | टिटवाळ्यात सापडला दुर्मिळ ब्लॅक कोब्रा

टिटवाळ्यात सापडला दुर्मिळ ब्लॅक कोब्रा

Next
>ऑनलाइन लोकमत
टिटवाळा, दि. 22 - येथे एका घरातून ब्लॅक कोब्रा पकडण्यात आला आहे. सर्पमित्र राहूल साळवे याने आपल्या मित्रांसोबत हा विषारी साप पकडला आहे. ब्लॅक कोब्रा नावाची जात आपल्याकडे खुप दुर्मीळ आहे. सापाला पकडल्यानंतर सर्पमित्रांनी लगतच्या फळेगांव येथील जंगलात सोडून दिले आहे. 
 
देशेकर नगर येथे साप निघाला असल्याचा फोन सर्पमित्र राहूल साळवे याला आला. त्याने तातडीने आपली साप पकडण्याची सामुग्री काढली व आपले इतर दोन सर्पमित्र निखिल कांबळे व विकी निरसट यांना बोलावून घेतले. तिघे ही एका दुचाकी वरून देशेकर नगर येथे पोहोचले. तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. 
 
देशेकर नगर येथील चाळीतील रूममधील कपाटा खाली हा साप लपून बसला रूम मालक याने सर्पमित्र यांना सांगितले. कुठल्या जातीचा हा साप आहे हे कुणालाही माहिती नव्हते. तो विषारी आहे की बिन विषारी याची कुणाला देखील माहिती नव्हती. फक्त बघण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली आली होती. सर्पमित्र तेथे पोहचताच बघ्यांनी त्यांना वाट मोकळी करून दिली. सर्पमित्र यांनी आपली साप पकडण्याची सामुग्री बाहेर काढून साप पडण्यासाठी रूम मध्ये प्रवेश केला. सर्पमित्र साळवे व त्याचे दोन साथीदार यांनी सावधपणे कपाटा खाली पाहिले असता साप दिसून आला. एका तासाच्या अथक प्रयत्नाने अखेर त्या लपून बसलेल्या सापला बाहेर करून पकडण्यात आले.
ही बातमी समजताच घर मालक व शेजारच्यानी सुटकेचा निश्वास सोडला. सदर चार फुटी साप हा भरपूर विषारी बॅल्क कोब्रा नावाचा साप असल्याचे सर्पमित्र राहूळ साळवे यांनी सांगितले. हे ऐकताच बघ्यांनी भितीने तोंडात बोट घातली. सदर सापाला पकडून सर्पमित्र यांनी लगतच्या फळेगांव येथील जंगलात सोडून दिले. 
ही ब्लॅक कोब्रा नावाची जात आपल्याकडे खुप दुर्मीळ आहे. हा साप खुपच विषारी आहे. प्रथमच इतक्या मोठय़ा आकाराचा ब्लॅक कोब्रा साप मला पकडण्याची संधी मिळाली. खुप प्रयत्न केले तेव्हा तो सापडला.
- राहुल साळवे, सर्पमित्र, टिटवाळा 
 

Web Title: Rare black cobbler found in a tray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.