दुर्मिळ रानबदकाचे अकोल्यात आगमन

By Admin | Published: January 3, 2015 01:02 AM2015-01-03T01:02:12+5:302015-01-03T01:02:12+5:30

‘फॅलकेटेड डक’ ; पानवठय़ांवर स्थलांतरीत पक्ष्यांची किलबील.

Rare Rainfall Arrive in Akola | दुर्मिळ रानबदकाचे अकोल्यात आगमन

दुर्मिळ रानबदकाचे अकोल्यात आगमन

googlenewsNext

अकोला : हिवाळा सुरू झाला, की सर्व पक्षिमित्र आणि पक्षी अभ्यासकांना उत्सुकता लागते ती स्थलांतरीत पक्ष्यांच्या आगमनाची. अकोल्यातील पक्षीमित्र व अभ्यासक दिपक जोशी, डॉ. मिलिंद चौखंडे, विष्णु लोखंडे व रवि घोंगळे यांनी दररोज ३ तास, अशा सलग आठवडाभर कुंभारीच्या तलावावर पक्ष्यांच्या महत्वपूर्ण नोंदी घेतल्या. या मोहिमेत पक्षीमित्रांना ह्यफॅलकेटेड डकह्ण हे अतिशय दुर्मिळ रानबदक आढळून आले.
प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सलिम अली यांनी ह्यफॅलकेटेड डकह्णची नोंद आपल्या ह्यदि बुक ऑफ इंडियन बर्डसह्ण या पुस्तकात केली आहे. गुजरात व नेपाळ या भागात एकटाच आढळणारा हा पक्षी कुंभारीच्या तलावावर निरिक्षण करणार्‍या पक्षीमित्रांनाही एकटाच आढळून आला. विशेष बाब म्हणजे या निरिक्षणादरम्यान पक्षीमित्रांना ह्यलिटिल ग्रीन हेरॉनह्ण व ह्ययुरेशियन व्हिजनह्ण या देखण्या व दुर्मिळ द्विजगणांनीदेखील दर्शन दिले.
वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांचा विस्तार झपाट्याने होतोय. कधी काळी शहरांपासून अंतर ठेवून असणारे तलाव-बंधारे आज शहराचेच भाग बनले असल्याने पाणवठय़ांवर विसावणार्‍या पक्ष्यांची संख्या रोडवत चालली आहे. युरोप, लद्दाख, रशिया, सैबेरिया, मध्य आशिया या भागातून हे पक्षी या परिसरात येतात. वनविभागामार्फत नुकतीच पाणवठय़ावरील पाणपक्ष्यांची गणना करण्यात आली. पहिला टप्पा म्हणून वनविभागाने एका दिवसात ही गणना आटोपती घेतली. वनविभागाने सलग पंधरा दिवस किंवा आठवडाभर पक्षीमित्रांना सोबत घेऊन ही गणना केल्यास निश्‍चितच महत्त्वाच्या नोंदी हाती येतील, अशी आशा पक्षीमित्रांनी व्यक्त केली.

Web Title: Rare Rainfall Arrive in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.