वन विभागाच्या पुस्तिकेत ‘राशीचक्र’!
By admin | Published: August 28, 2015 01:03 AM2015-08-28T01:03:31+5:302015-08-28T01:03:31+5:30
वेगवेगळ््या वृक्षांची जोपासना व्हावी व वनीकरणात वाढ व्हावी याकरिता वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पुुस्तिकेत राशी चिन्हे आणि नवग्रहांनुसार तसेच रामायण-महाभारतामधील झाडे
मुंबई : वेगवेगळ््या वृक्षांची जोपासना व्हावी व वनीकरणात वाढ व्हावी याकरिता वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पुुस्तिकेत राशी चिन्हे आणि नवग्रहांनुसार तसेच रामायण-महाभारतामधील झाडे आणि वेगवेगळ््या धर्मांशी संलग्न झाडे यांचा समावेश करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
सामाजिक वनीकरण व वन विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या या पुस्तिकेत भारतीय संस्कृतीत वनांना देवतांच्या रुपात बघितले जाते, असे नमूद केले आहे. विवाहित स्त्रीया अशोक, मोहा, आंबा यांची पती मानून पुजा करतात तर पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी वट पौर्णिमेला वडाची पूजा करतात. मानवाला आपला धर्म व रितीरिवाज अत्यंत प्रिय असतात. आताच्या विज्ञान युगात सुद्धा त्याची प्रचिती येते, असे नमूद केले आहे.
राशी चिन्हानुसार झाडे यांची जंत्री देताना मेष, वृषभ, मिथून, कर्क वगैरे राशीकरिता असलेल्या आवळा, तांदूळ, सूर्यफूल, गुग्गुळ, पळस, मूग वगैरे वृक्षांचा यामध्ये समावेश केलेला आहे.
सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु आदी नवग्रहांकरिता असलेल्या झाडांचीही यादी प्रसिद्ध केलेली आहे. रामायणात उल्लेख झालेल्या १९ वृक्षांची तर महाभारतात उल्लेख झालेल्या ३३ वृक्षांची यादी पुस्तिकेत नमूद केलेली आहे. इस्लाम, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन, पारशी धर्माशी संलग्न
झाडांची यादी दिलेली असून रामायणातील ज्या अशोक वनात रावणाने सीतेला नेऊन ठेवले होते तेथील ३७ वृक्षांची जंत्री दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)