नागपुरात राशी महाजन टॉप
By admin | Published: May 25, 2016 07:12 PM2016-05-25T19:12:13+5:302016-05-25T19:12:13+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल कमी लागला आहे. विभागाने राज्यात पाचवे स्थान मिळविले. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८६.३५ टक्के इतकी आहे. ९२.११ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ५.७६ टक्क्यांची घट झाली आहे. नागपूरच्या सिटी प्रिमिअर कॉलेजची विद्यार्थिनी राशी महाजन हिने ९७.८५ टक्के (६३६) गुण प्राप्त करत नागपूरातून अव्वल क्रमांक पटकाविला आहे.
राशीपाठोपाठी नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी भारती बजाज हिने ९६.९२ टक्के (६३०)गुण प्राप्त करत दुसरे स्थान पटकाविले. वाणिज्य शाखेतून हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृतिका बदानी हिने ९५.२२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर कला शाखेतून एलएडी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रितिका श्रीवास्तव हिने ९६.६ टक्के (६२८) गुण मिळवत टॉप केले.
विद्यार्थिनींनी मारली बाजी
विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७७ हजार ६८६ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ६९ हजार २५० उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.१४ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ८३.५७ टक्के इतके आहे. सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ५५ हजार ७२८ पैकी १ लाख ३४ हजार ४७३ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.
नियमित विद्यार्थ्यांची विभागीय आकडेवारी
अभ्यासक्रम परीक्षार्थी उत्तीर्ण टक्केवारी
विज्ञान ६१,२८५ ५७,९७० ९४.५९
कला ६४,९०९ ५०,७३५ ७८.१६
वाणिज्य २१,३०८ १८,९५६ ८८.९६
एमसीव्हीसी ८,२२६ ६,८१२ ८२.८१
एकूण १,५५,७२८ १,३४,४७३ ८६.३५
विभागात नागपूर जिल्हा टॉप
नागपूर विभागात यंदा नागपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. नागपूर जिल्ह्यातून ६२ हजार १४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५४ हजार ९९९ म्हणजेच ८८.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली जिल्ह्याची आहे. तेथे १२ हजार ३३९ पैकी १० हजार २०६ म्हणजे ८२.७१ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी
जिल्हा निकाल टक्केवारी
भंडारा ८८.३५%
चंद्रपूर ८३.५५ %
नागपूर ८८.५१ %
वर्धा ८३.५२ %
गडचिरोली ८२.७१ %
गोंदिया ८६.५२ %