विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
By admin | Published: June 28, 2017 01:47 AM2017-06-28T01:47:50+5:302017-06-28T01:47:50+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने ३० जूनपूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती स्थापन करावी, असे आदेश राज्य शासनाला दिले आहेत़ समितीच्या
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : मुंबई उच्च न्यायालयाने ३० जूनपूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती स्थापन करावी, असे आदेश राज्य शासनाला दिले आहेत़ समितीच्या स्थापनेसाठी केवळ दोनच दिवस शिल्लक असून, समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्व वारकरी, भाविक भक्तांचे लक्ष लागले आहे़
गेल्या चार वर्षांपासून मंदिर समितीचा कारभार पूर्णपणे प्रशासनाच्या ताब्यात आहे़सध्या जिल्हाधिकारी हे समितीचे सभापती म्हणून काम पाहत आहेत़ मध्यंतरी मंदिरासंदर्भातील एका याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ३० जूनपर्यंत स्थायी स्वरुपाची समिती स्थापन करावी, असे आदेश राज्य शासनाला दिले आहेत़