OBC आरक्षणासह विविध मागण्यांवरून 'रासप' आक्रमक; महादेव जानकरांच्या नेतृत्वात 5 ऑगस्टला भव्य मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 03:50 PM2022-08-03T15:50:43+5:302022-08-03T15:51:59+5:30

Rashtriya Samaj Paksha : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 

rashtriya samaj paksha aggressive on various demand including obc reservation, march on august 5 in delhi | OBC आरक्षणासह विविध मागण्यांवरून 'रासप' आक्रमक; महादेव जानकरांच्या नेतृत्वात 5 ऑगस्टला भव्य मोर्चा

OBC आरक्षणासह विविध मागण्यांवरून 'रासप' आक्रमक; महादेव जानकरांच्या नेतृत्वात 5 ऑगस्टला भव्य मोर्चा

googlenewsNext

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) प्रश्नासह विविध मागण्यांच्या मुद्यांवरुन राष्ट्रीय समाज पक्ष  (Rashtriya Samaj Paksha) आक्रमक झाला आहे. या मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने येत्या 5 ऑगस्टला दिल्लीत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 

दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरुन राष्ट्रीय समाज पक्षच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे. संसदेवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध मागण्यांसाठी 5 ऑगस्टला दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे. जातनिहाय जनगणना करणे, ओबीस आरक्षण कायम करणे, मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 

दरम्यान,  या मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्ष चांगलाच आक्रम झाल्याचे दिसून येत आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी बारामतीमधून देखील मोठ्या प्रमाणावर लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांनी दिली आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी या मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात माहिती पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनीही दिली होती. त्यावेळी, या आंदोलनात देशातील ओबीसी समाजातील प्रतिनिधी आणि नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थितत राहून प्रशासनाचे लक्ष वेधून घेणार असून ओबीसीच्या बाबतीत राजकारणात दुजाभाव होतो आहे. त्यामुळे आपसुकच राजकारणतील ओबीसी प्रतिनिधीत्व कमी होत चालले आहे, अशी माहिती बालाजी पवार यांनी दिली होती.

काय आहेत प्रमुख मागण्या ?
- जातनिहाय जनगणना व्हावी
- ओबीसी आरक्षण कायम करावे
- नॉन क्रिमिलिअरची अट रद्द करावी
- 50 टक्के सिलींग हटविणे
- सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे
- न्याय व्यवस्था, सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करावे
- धान्य मालाला हमीभावाने खरेदीची हमी द्यावी
- महागाई थांबविण्यासाठी ठोस पावले उचलावीत
- संपूर्ण मोफत शिक्षण द्यावे, तसेच मोफत आरोग्य सुविधा द्यावी.

Web Title: rashtriya samaj paksha aggressive on various demand including obc reservation, march on august 5 in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.