राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तरुण होतोय
By admin | Published: October 26, 2016 09:28 PM2016-10-26T21:28:53+5:302016-10-26T21:28:53+5:30
मार्च महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन गणवेशाची घोषणा झाली व विजयादशमीपासून स्वयंसेवक ‘फुलपॅन्ट’मध्ये दिसू लागले. या घोषणेपासूनच तरुणांची पावले शाखांकडे जास्त प्रमाणात वळू लागली आहेत.
Next
id="yui_3_16_0_ym19_1_1477491322269_19015">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 26 - मार्च महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन गणवेशाची घोषणा झाली व विजयादशमीपासून स्वयंसेवक ‘फुलपॅन्ट’मध्ये दिसू लागले. या घोषणेपासूनच तरुणांची पावले शाखांकडे जास्त प्रमाणात वळू लागली आहेत. मागील नोव्हेंबर महिन्यापासून वर्षभरात देशपातळीवर संघाच्या शाखा दीड हजारांहून अधिक संख्येने वाढल्या आहेत. विशेष म्हणजे संघाच्या एकूण शाखांपैकी ९० टक्के शाखा तरुण स्वयंसेवकांच्या आहेत. एकूणच नवीन गणवेशामुळे संघ शाखांचे ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षापासून संघाचा कार्यविस्तारावर भर आहे. संघ स्थान आणि शाखांची संख्या वाढीस लागावी यासाठी संघाकडून सातत्याने विविध पातळ््यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील वर्षी रांची येथे झालेल्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीदरम्यान देशभरात ५० हजार ४३२ शाखा होत्या. २२ ते २४ आॅक्टोबरदरम्यान तेलंगणातील भाग्यनगर येथे झालेल्या बैठकीत ही संख्या ५२ हजार १०२ इतकी झाल्याचे सांगण्यात आले. वर्षभरात १ हजार ६७० संघ शाखा वाढल्या आहेत.
वेगवेगळ््या वयोगटाचा विचार केल्यास शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थी व ४० वर्षाखालील लोकांच्या शाखा ९०.८१ टक्के असून ४५ वर्षावरील स्वयंसेवकांच्या केवळ ९.१८ टक्के शाखा लागतात.
भाग्यनगर येथील बैठकीतील विविध मुद्द्यांबाबत विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी पत्रकार भवनात माहिती दिली. यावेळी संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अतुल पिंगळे व विश्व संवाद केंद्राचे उपप्रमुख प्रसाद बर्वे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शाखांमध्येदेखील वाढ
देशपातळीवर संघाकडून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यादेखील शाखा लावण्यात येतात. नवीन गणवेशाच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांच्या शाखांमध्येदेखील वाढ झाली आहे.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संयुक्त शाखांची संख्या ५०९ ने वाढली आहे. सद्यस्थितीत ही संख्या २६ हजार ६७६ इतकी आहे. तर केवल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शाखांची संख्या वर्षभरात ७१६ ने वाढली आहे. देशपातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ७ हजार २८ शाखा लागतात.