मॅनेजमेंट गुरू गंगाराम तळेकर यांचे स्मृती पित्यार्थ रोटीबँकेचा रथ कार्यरत
By admin | Published: July 23, 2016 01:38 PM2016-07-23T13:38:32+5:302016-07-23T13:38:32+5:30
डबेवाले संघटनेचे नेते मॅनेजमेंट गुरू कै. गंगाराम तळेकर यांचे प्रथम स्मृती 2९/१२/२०१५ दिना पासून डबेवाल्यांनी रोटी बँकेची चळवळ चालू केली.
Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - डबेवाले संघटनेचे नेते मॅनेजमेंट गुरू कै. गंगाराम तळेकर यांचे प्रथम स्मृती 2९/१२/२०१५ दिना पासून डबेवाल्यांनी रोटी बँकेची चळवळ चालू केली. रोटी बॅन्केची चळवळ चालू केल्यापासून मुंबईतील मोठ मोठ्या पार्ट्यांचे आयोजक पार्टी मधील शिल्लक राहिलेले अतिरीक्त अन्न आता फेकुन देत नहीत.तर डबेवाल्यांच्या रोटी बॅन्केला देतात.मुंबईच्या डबेवाल्यांना फोन करून ते अन्न घेऊन जायला सांगतात.मग डबेवाला सायकल वरून येतो आणी ते अन्न घेऊन जातो व भुकेल्यांना वाटतो.आज रोजी सरासरी २०० जणांना दररोज अन्न वाटण्याचे काम मुंबईचा डबेवाला करतो आहे.
हे काम करत असताना अनेक अडचणी येत होत्या त्या मध्ये विषेशता पाच सहा लोकांचे अन्न असेल तर डबेवाला ते अन्न सायकल वर सहज आणत असे व त्याचे वाटप करत असे. पण हेच अन्न वीस पंचविस जणांचे असले की डबेवाल्यांची पंचायत होत असे. त्याला हे अन्न सायकल वर नेता येत नसे त्या साठी त्याला टॅक्सी किंव्हा रिक्षा करावी लागत असे व त्याचे भाडे आपल्या खिशातून द्यावयाला लागत असे. आधीच विना मेहनाताना,विना मोबदला,हे काम डबेवाला करतो. त्यात ही पदरची पदर मोड ही कधी कधी त्याला करावी लागत असे.ही अडचण डाॅ.पवन अग्रवाल यांनी दूर केली.मॅनेजमेंट गुरू कै.गंगाराम तळेकर यांचे स्मृती पित्यार्थ मारूती व्हॅन रोटी बॅन्केला देउ केली.ही गाडी उपनगरात कार्यरत राहील व रोटीबॅन्केचे काम करील.मुंबईचे डबेवाले हे "स्वच्छ भारत अभियानाचे" अॅम्बॅसिडर आहेत याची जाणीव ठेऊन या गाडीवर "स्वच्छ भारत अभियानाचे" संदेश लिहलेले असतील. या माध्यमातुन स्वच्छ भारत अभियान लोकांन पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न राहील.
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे हस्ते या रोटी बॅन्केच्या रथाचे अनावरण केले जाणार आहे.