राठोड दाम्पत्याने केली एव्हरेस्ट चढाई

By admin | Published: June 9, 2016 04:42 AM2016-06-09T04:42:39+5:302016-06-09T04:42:39+5:30

जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची अभिमानास्पद कामगिरी शहर पोलिस दलातील दाम्पत्याने केली आहे.

Rathod kicks off Everest Everest | राठोड दाम्पत्याने केली एव्हरेस्ट चढाई

राठोड दाम्पत्याने केली एव्हरेस्ट चढाई

Next


पुणे : जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची अभिमानास्पद कामगिरी शहर पोलिस दलातील दाम्पत्याने केली आहे. त्यामुळे शहर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात तारकेश्वरी भालेराव -राठोड (३०) व दिनेश टी. राठोड (३०) हे कार्यरत आहेत. ते २००६ साली शहर पोलिस दलात रूजु झाले. तारकेश्वरी या राष्ट्रीय फुटबॉलपटू असून, आंतरराष्ट्रीय कराटेपटू देखील आहे. तर दिनेश हे आंतरराष्ट्रीय कराटे व किकबॉक्सिंगपटू आहेत. या दोघांचा २००८ साली प्रेमविवाह झाला. आपल्या एव्हरेस्टच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. शिखर सर केल्याने स्वप्नपूर्ती झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या दाम्पत्याचा हा दुसरा प्रयत्न असून, गेल्या वर्षी एव्हरेस्टवर झालेल्या हिमस्खलनामुळे त्यांना आपला प्रयत्न अर्ध्यावर सोडून द्यावा लागला होता. या वर्षी देखील या दाम्पत्याने पोलीसखात्यातून परवानगी घेऊन ध्येयपूर्तीसाठी एव्हरेस्टवर चढाईचा निर्णय घेतला. हे दाम्पत्य ३० एप्रिलला बेसकॅम्पजवळ पोहचले. तब्बल २३ दिवस दिवस चाललेल्या या मोहिमेची २३ मे रोजी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी यशस्वी सांगता झाली.
या विषयी लोकमतला माहिती देताना दिनेश म्हणाले, अखेरच्या टप्प्यात २१ मे रोजी वातावरण अचानक खराब झाले. सायंकाळी सात नंतर रात्री एक ते दोन पर्यंत जोरदार वारे वाहत होते. बर्फवृष्टी देखील झाली. मात्र बर्फाच्या टणक गोळ््यांचा मारा व्हावा, अशी ही बर्फवृष्टी होती. हवामान विभागाने २३ तारखेनंतर वातावरण आणखी खराब होण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्याआधीच पोहचणे गरजेचे होते. त्यामुळे २२ मे रोजी सकाळी सहा वाजता कॅम्प३ पासून सुरूवात केली. साधारण सकाळी साडेअकरा वाजता कॅम्प फोर पर्यंत पोहोचलो. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत विश्रांती केली. या नंतर अखेरच्या टप्प्याची चढाई पूर्ण करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर सकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले.
>गिर्यारोहकांचा धक्कादायक मृत्यू
बेस कॅम्पवर असताना कोलकाता पोलिस दलातील गोतम घोष हा गिर्यारोहक आपणहून भेटीला आला होता. गिर्यारोहण करताना काय काळजी घ्यायची याचे त्याने आम्हाला मार्गदर्शन केले. मात्र २१ मेच्या रात्री घोष यांच्यासह त्यांच्या दोघा पुरूष गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याचे कळले. तसेच त्यांच्या बरोबरील सरीता हाजरा या महिला गिर्यारोहकाला हिमदंश झाल्याने हाताची बोटे गमवावी लागली. तसेच दोन्ही पायांना देखील गंभीर दुखापत झाल्याचे समजले. ज्या व्यक्तीने बेसकॅम्पवर असताना आम्हाला स्वत:हून मार्गदर्शन केले, त्याचा व्यक्ती झालेला मृत्यू धक्कादायक होता.

Web Title: Rathod kicks off Everest Everest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.