‘शिधा’ शिल्लक, या आणि घेऊन जा; वितरणाबाबत राज्य सरकारचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 10:34 AM2023-10-13T10:34:39+5:302023-10-13T10:35:32+5:30
सामान्यांचा सण गोड व्हावा, या उद्देशाने हा ‘आनंदाचा शिधा’ आता दिवाळीतही वितरित करण्यात येणार आहे.
पुणे : गणेशोत्सवात रेशन दुकानांमध्ये साखर, चणाडाळ, रवा व पामतेल या चार वस्तू शंभर रुपयांत वितरित करण्यात आल्या. सामान्यांचा सण गोड व्हावा, या उद्देशाने हा ‘आनंदाचा शिधा’ आता दिवाळीतही वितरित करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा १० ऑक्टोबरपर्यंत वितरित करण्याची मुदत दिली होती. मात्र, आतापर्यंत ९५ टक्के वितरण झाल्याने शिल्लक आनंदाचा शिधा ‘जो घेईल त्याला द्यावा,’ असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.