रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांना कारावास

By admin | Published: May 4, 2015 01:39 AM2015-05-04T01:39:27+5:302015-05-04T01:39:27+5:30

रेशनच्या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून ६ महिने कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचे अन्न

Ration black marketers imprisonment | रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांना कारावास

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांना कारावास

Next

अहमदनगर : रेशनच्या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून ६ महिने कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी रविवारी येथे सांगितले. राज्यातील पहिल्या बायोमेट्रिक धान्यवाटप उपक्रमाचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
सर्वसामान्य नागरिकांना गरजेनुसार धान्य मिळावे, यासाठी पुरवठा विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत़ धान्य वितरणातील अडचणी दूर केल्या जातील. विभागाचे प्रमुख अधिकारी वितरणातील त्रुटी अभ्यासत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाच धान्य मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
धान्यातील काळाबाजाराला आळा बसला पाहिजे, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्याचे वाटप करण्याचा निर्णय झाला़ त्यासाठी सरकारने १०० कोटींची तरतूद केली़ राज्यातील पहिला प्रयोग नगरमध्ये होत असून, नगर जिल्हा धान्य वितरणात राज्यात आदर्श ठरला आहे़ जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या अधिकारी व दुकानदारांच्या सहकार्यामुळे हा प्रयोग यशस्वी होत आहे़ दुकानदारांनी नव्या पद्धतीला सहकार्य करावे़ दुकानदारांना धान्य वाटपाचे काम परवडत नाही, याची शासनाला जाणीव असून, कमिशन वाढवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ तसेच तुटीचाही विचार केला जात असल्याचे बापट यांनी सांगितले.
राज्यातील गोरगरीब उपाशी राहणार नाही, याची सरकार काळजी घेत आहे. ‘एपीएल’धारकांना धान्य देण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे़ सर्वच स्तरातील गोरगरिबांना धान्याचे वाटप केले जाईल़ मात्र त्याआधी धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील़ मागील आठवड्यात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ जिल्हाधिकाऱ्यांचीही याबाबत लवकरच बैठक घेऊन वितरणात सुधारणा केली जाणार असून, दुसऱ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्यांचे पोट फाडल्याशिवाय सरकार राहणार नाही, असा इशारा बापट यांनी दिला़ (प्रतिनिधी)

Web Title: Ration black marketers imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.