रतलामचा विजय हा मोदी सरकारविरोधात

By admin | Published: November 25, 2015 03:48 AM2015-11-25T03:48:03+5:302015-11-25T03:48:03+5:30

मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांनी ८८ हजार मतांनी मिळविलेला मोठा विजय मोदी

Ratlam's victory is against the Modi government | रतलामचा विजय हा मोदी सरकारविरोधात

रतलामचा विजय हा मोदी सरकारविरोधात

Next

मुंबई : मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांनी ८८ हजार मतांनी मिळविलेला मोठा विजय मोदी सरकारविरोधातील जनमताचा आणखी एक कौल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेशसारख्या भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात झालेला भाजपाचा हा पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नक्कीच उत्साहवर्धक आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत रतलामला भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली व भाजपाने दिवंगत खासदाराच्या कन्येला उमेदवारी दिली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. परंतु, सहानुभूती किंवा मोदी-चौहान यांचा कोणताही करिश्मा या ठिकाणी दिसून आला नाही.
उलट भाजपा सरकारच्या धोरणांबाबत जनतेने मतपेटीतून आपला असंतोष व्यक्त केल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Ratlam's victory is against the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.