या हरामखोरांना चपलेचा हार घातला पाहिजे, निलेश राणेंची खासदार राऊत यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 08:53 PM2018-01-10T20:53:16+5:302018-01-10T20:53:32+5:30
राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्प परिसरातील जागा शहा, जैन यांनी विकत घेतल्याच्या खासदार विनायक राऊत यांच्या विधानावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
रत्नागिरी - राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्प परिसरातील जागा शहा, जैन यांनी विकत घेतल्याच्या खासदार विनायक राऊत यांच्या विधानावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. रिफायनरी प्रकल्प गेल्या तीन महिन्यांत अधिक चर्चेचा झाला आहे.
प्रकल्पाबाबत विरोध वाढू लागल्याने शिवसेनेने आता ठाम विरोधाची भूमिका घेतली आहे. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाम विरोधाची भूमिका मांडली. या प्रकल्प परिसरात शहा, जैन आशा गुजरातमधील लोकांनी जमिनी घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली आहे. त्यांच्या या विधानाला माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विट करुन उत्तर दिले आहे.
ते म्हणतात, "विनायक राऊतला खासदारकीच्या ४ वर्षांनंतर जमीन बाहेरच्या लोकांनी घेतली असं कळलं?. ह्यांच्याच उद्योगमंत्र्यांनी प्रकल्प जाहीर करायचा, खासदारांनी जमीन दाखवायची आणि विरोध होतोय लक्षात आल्यावर हे सगळं आम्ही नाही केलं सांगायचं. चपलेचा हार घातला पाहिज ह्या हरामखोरांना", माजी खासदार निलेश राणेंच्या या ट्विटमुळे आता शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.