शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड यांची पाठराखण, विमान कंपन्यांविरोधात आणणार हक्कभंग

By admin | Published: March 25, 2017 10:14 PM2017-03-25T22:14:10+5:302017-03-25T22:14:37+5:30

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना सेवा नाकारणा-या विमान कंपन्यांविरोधात शिवसेना लोकसभेत हक्कभंग आणणार आहे.

Raveendran Gaikwad's backing from Shivsena, Dwarka's right to bring air companies | शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड यांची पाठराखण, विमान कंपन्यांविरोधात आणणार हक्कभंग

शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड यांची पाठराखण, विमान कंपन्यांविरोधात आणणार हक्कभंग

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना सेवा नाकारणा-या विमान कंपन्यांविरोधात शिवसेना लोकसभेत हक्कभंग आणणार आहे. यावरुन शिवसेना रवींद्र गायकवाड यांची पाठराखण करत असल्याचे दिसत आहे.  गायकवाड यांनी प्रवेशबंदी करणा-या एअर इंडिया आणि अन्य विमान कंपन्यांविरोधात शिवसेना हक्कभंग आणणार आहे. 
 
काय आहे नेमके प्रकरण?
पायातील चप्पल काढून एअर इंडियाच्या कर्मचा-याला बेदम मारहाण करणाऱ्या शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांना एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांनी नो फ्लाय यादीत टाकले आहे. एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्या त्या कृत्याचा जाहीर निषेध करत त्यांना विमानातून प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. भारतातील सर्वच विमान कंपन्यांनी विमानप्रवास करण्याची बंदी घातल्यामुळे रवींद्र गायकवाड यांना प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये रेल्वेचा समावेश आहे. मात्र रेल्वेला लागणारा वेळ पाहता हा निर्णय घेणं तस त्यांच्यासाठी कठीण आहे.  
 
विमान कंपन्यानी गायकवाड यांच्यावर घातलेल्या बंदीच्या निर्णयाला टाटा समूहातील कंपन्यांनीही पाठिंबा दर्शवला असून त्यामुळे व्हिसारा आणि एअर एशियाच्या विमानांमध्येही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे गायकवाड यांना दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचा सहारा घ्यावा लागणार. रेल्वेशिवाय ते स्वत:च्या चार्टेट हेलिकॉप्टर किंवा गाडीने प्रवास करु शकतात.
 
दरम्यान, झालेल्या सर्वच प्रकरणावर रविंद्र गायकवाड यांनी साधी खंतही व्यक्त केली नाही. उलट आपण त्याला सँडलने २५ वेळा मारले, असे स्वत: सांगितले. उस्मानाबादाचे खासदार गायकवाड यांच्याविरुद्ध मारहाण केल्याचा आणि एअर इंडियाचे विमान तब्बल ४0 मिनिटे रोखून धरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
रवींद्र गायकवाड यांच्या या कृत्याचं समर्थन करणार नाही, मात्र त्यांच्यावर ही वेळ का आली याचा तपास व्हावा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाविरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, यामध्ये त्यांनी आपल्याला धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला आहे. 
 

Web Title: Raveendran Gaikwad's backing from Shivsena, Dwarka's right to bring air companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.