Raver Lok Sabha Result 2024: रक्षा खडसे २७ हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:58 AM2024-06-04T09:58:44+5:302024-06-04T09:59:10+5:30
Raver Lok Sabha Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये रक्षा खडसे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
Raver Lok Sabha Result 2024:रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने सलग तिसऱ्यांदा विद्यमान खासदार रक्षा खडसे(Raksha Khadse) यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने श्रीराम पाटील(Shriram Patil) यांना उमेदवारी दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, हाती आलेल्या कलांनुसार, रक्षा खडसे सुमारे २७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर श्रीराम पाटील यांना १८ हजार मते मिळाल्याची माहिती मिळाली आहे.
रावेर मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता प्रक्रियेला वेग आला आहे. रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये परतणार असल्याचे घोषित केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन आता निकालाचा दिवस आला, तरी एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश रखडल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काही टप्प्यांतील मतमोजणी पूर्ण झाली असून, या कलांनुसार, रक्षा खडसे यांना २७ हजार ९२० मते मिळाली असून, ०९ हजार ३९७ मतांनी आघाडी घेतली आहे. तर, श्रीराम पाटील पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीराम पाटील यांना १८ हजार ५२३ मते मिळाली आहेत. अद्याप मतमोजणीच्या अनेक फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे अंतिम निकाल काय लागतो, याकडे भाजपा आणि महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांना ०६ लाख ५५ हजार ३८६ मते मिळाली होती. एकूण मतांपैकी ६० टक्के मते रक्षा खडसे यांना मिळाली होती. तर काँग्रेसचे उल्हास पाटील पराभूत झाले होते. त्यांना ०३ लाख १९ हजार ५०३ मते मिळाली होती.