राजू शेट्टींना मोठा धक्का; ‘स्वाभिमानी’च्या रविकांत तुपकरांनी साथ सोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 19:24 IST2019-09-26T18:58:31+5:302019-09-26T19:24:35+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना जागावाटपावेळी 49 मतदारसंघांवर त्यांनी गेल्याच आठवड्यात दावा केला होता.

राजू शेट्टींना मोठा धक्का; ‘स्वाभिमानी’च्या रविकांत तुपकरांनी साथ सोडली
अकोला : कालपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत असणारे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने विदर्भामध्ये मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना जागावाटपावेळी 49 मतदारसंघांवर त्यांनी गेल्याच आठवड्यात दावा केला होता. तसेच राजू शेट्टी यांचे ते खंदे समर्थक मानले जात होते. सदाभाऊ खोत यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर पक्षामध्ये तुपकरच दोन नंबरचे नेते होते. यामुळे त्यांना स्वाभिमानीने प्रदेशध्यक्षपदही दिले होते. मात्र, तुपकर यांनी राजीनामा दिल्याने राजू शेट्टी यांना मोठा धक्का मानला जात आहे.
अकोला- ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा राजीनामा https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) September 26, 2019
तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी बॅटींगही केली होती. भाजप प्रवेश लवकरच केला जाणार असून मुहूर्ताची वाट पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तुपकरांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री व रविकांत तुपकरांमध्ये चर्चा झाली.