एअर इंडियाच्या विरोधात हक्कभंग आणणार - रवींद्र गायकवाड

By Admin | Published: March 26, 2017 09:44 PM2017-03-26T21:44:18+5:302017-03-26T21:44:18+5:30

मी अज्ञातवासात वगैरे गेलेलो नाही. मंगळवारी गुढी पाडव्याच्या दिवशी मी उमरगा या मूळ गावी असेन. दुसऱ्या दिवशी मी लोकसभेच्या कामकाजाला उपस्थित असेन

Ravindra Gaikwad will bring a claim against Air India | एअर इंडियाच्या विरोधात हक्कभंग आणणार - रवींद्र गायकवाड

एअर इंडियाच्या विरोधात हक्कभंग आणणार - रवींद्र गायकवाड

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
उमरगा, दि. 26 : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणानंतर आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेसने मुंबईकडे निघालेले उस्मानाबादचे खा. प्रा. रवींद्र गायकवाड हे मुंबईऐवजी वापी स्थानकावर उतरून उस्मानाबादकडे रवाना झाले. मात्र, ते अद्यापही जिल्ह्यात पोहोचले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांसह शिवसैनिकही त्यांच्या प्रतीक्षेत आहेत.
गायकवाड हे रविवारी उमरगा येथे येणार असल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. मात्र, दिल्लीहून रेल्वेने निघालेले गायकवाड यांनी प्रसारमाध्यमाचा सिसेमारा चुकवीत थेट मुंबई गाठली व सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन परत दिल्लीला रवाना झाल्याचे उमरगा येथील खासदारांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले. सोमवारी संसद अधिवेशनात एअर इंडियाच्या विरोधात सेनेच्या वतीने हक्कभंग प्रस्ताव आणण्यात येणार असल्याने ते उस्मानाबादला न येता परत दिल्लीला गेले असून, दिल्लीहून ते शुक्रवारपर्यंत येथे परत येतील, असेही कार्यालयाकडून सांगण्यात आले.


खा. रवींद्र गायकवाड यांना एअर इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करीत शिवसैनिकांच्या वतीने सोमवारी जिल्ह्यात उमरगा, लोहारा आदी ठिकाणी बंद ठेवून निषेध नोंदविण्यात येणार आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

एअर इंडियावर कायदेशीर कारवाई करणार - गायकवाड
मी अज्ञातवासात वगैरे गेलेलो नाही. मंगळवारी गुढी पाडव्याच्या दिवशी मी उमरगा या मूळ गावी असेन. दुसऱ्या दिवशी मी लोकसभेच्या कामकाजाला उपस्थित असेन, अशी माहिती खा. रवींद्र गायकवाड यांनी ‘पीटीआय’ला फोनवरुन दिली. बुधवारपर्यंत या विषयी मिडीयाशी बोलण्यास टाळण्याचा सल्ला पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने दिला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने मला शिवीगाळ केली. मी कायदेशीर कारवाई करणार असून बुधवारनंतर याविषयी सर्वांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील घटनेनंतर मला मातोश्रीवरुन बोलावणे आले नव्हते. त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्नच नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. घटनेचा व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. आपण कुठे आहात, या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली.

Web Title: Ravindra Gaikwad will bring a claim against Air India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.