रवींद्र गायकवाड यांचे विमान तिकीट पुन्हा रद्द

By Admin | Published: March 29, 2017 03:42 AM2017-03-29T03:42:10+5:302017-03-29T03:42:17+5:30

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत

Ravindra Gaikwad's plane ticket canceled again | रवींद्र गायकवाड यांचे विमान तिकीट पुन्हा रद्द

रवींद्र गायकवाड यांचे विमान तिकीट पुन्हा रद्द

googlenewsNext

मुंबई/ दिल्ली : एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत. गायकवाड यांनी काढलेले मुंबई-दिल्ली असे तिकीट एअर इंडियाने रद्द केले आहे.
गायकवाड यांनी एआय-८०६ या बुधवारी सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या विमानाचे तिकीट बूक केले. मात्र, कंपनीने ते तिकीट रद्द केले.एअर इंडियासह सात विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. खा. गायकवाड यांना पुन्हा विमानाने प्रवास करू देण्याची मागणी करणारा विशेषाधिकार प्रस्ताव शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी लोकसभाध्यक्षांकडे दिला. मात्र सरकारने ‘कोणाचेही गैरवर्तन हे विशेषाधिकाराखाली येत नाही’ अशी कठोर भूमिका घेतली आहे.
खासदारावर बंदी घातल्यामुळे सभागृहाच्या हक्कांचा भंग होतो त्यामुळे हा प्रश्न विशेषाधिकार समितीकडे पाठवावा, अशी विनंती शिवसेनेच्या सदस्यांनी मंगळवारी लोकसभाध्यक्षांकडे केली. मात्र दोन पानांच्या विशेषाधिकार प्रस्तावावर सरकार आणि शिवसेनेचे नेते यांच्यात तोडगा निघेल, म्हणून अध्यक्षांनी तो प्रलंबित ठेवला आहे. गायकवाड यांच्या वर्तनाने सगळ््या राजकीय वर्गाला खाली मान घालावी लागली असून कॅमेऱ्यांसमोर त्यांनी जो संताप व्यक्त केला त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करावा, असे भाजप नेतृत्वाने कळवले आहे. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुक्तार अब्बास नक्वी म्हणाले की, विशेषाधिकाराचाभंग कोणाच्याही गैरवर्तनाने होत नाही. नक्वी यांनी सेनेच्या खासदाराचा उल्लेख केला नाही. परंतु सरकारला या प्रकरणात नेमके काय वाटते हे स्पष्ट झाले आहे.
गायकवाड यांना विमान प्रवासाला परवानगी मिळावी, असे आवाहन शिवसेनेच्या प्रस्तावात आहे. परंतु सरकारच्या नेत्यांकडून शिवसेनेला अनौपचारिकरित्या असे सांगण्यात आले की खासदाराने खेद व्यक्त करावा किंवा त्यांना आणखी काही वेळ वाट बघावी. दिल्ली पोलिसांच्या विशेष चौकशी तुकडीकडून येणाऱ्या अहवालाची सरकारला प्रतीक्षा आहे. या तुकडीने १५ साक्षीदारांचे म्हणणे नोंदवून घेतले आहे. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही या प्रश्नावर निर्णय घेण्यास दिल्ली पोलिसांकडून या हंगामी अहवालाची माहिती दिली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Ravindra Gaikwad's plane ticket canceled again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.