रावतेंनी फोडले भ्रष्टाचाराचे खापर जनतेवर
By admin | Published: July 16, 2017 07:29 PM2017-07-16T19:29:47+5:302017-07-16T19:29:47+5:30
ज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचे खापर वाहनधारकांवरच फोडले आहे.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 16 : राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचे खापर वाहनधारकांवरच फोडले आहे. वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता परिवहन विभागात होणारी अत्यल्प भरतीमुळे अधिकारी, कर्मचा:यांवर ताण निर्माण होऊन अनेकदा कामात दिरंगाई होत असल्याने अनेक वाहनधारक व चालक परवान्यांसाठी दलालांना गाठतात. त्यामुळे परवाने व अन्य कार्यवाहीत गैरप्रकारांना वाव मिळत असल्याचे सांगत रावते यांनी या प्रकाराला सर्वसामान्य जनतेसह वाहनधारक व वाहन चालकच जबाबदार असल्याचे विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी विभागाच्या मेळाव्यात बोलताना रावते म्हणाले, विद्यार्थी वाहतूक व अन्य वाहन परवाने व कागदपत्रंसाठी वेळ नसल्याचे कारण देऊन अनेकजन दलालांमार्फत काम करून घेण्यास पसंती देतात. प्रत्येक्षात वाहन धारकांनी असे गैरमार्गाने परवाने मिळविणयापेक्षा व दलालाना पोसण्यापेक्षा आयुष्यभरासाठी मिळणा:या परवान्यांसाठी काही तास देण्याची गरज असून स्वत:च्या परवान्यांची पूर्तता स्वत:च करण्याची गरज असल्याचे परखड मत व्यक्त केले. त्यामुळे कर्मचारी व दलालांकडून चिरीमीरचे प्रकार घडण्याच्या विधानावर टाळ्य़ा पिटणा:या उपस्थितांमध्ये एकदम सन्नाटा पसरला. यावेळी रावते यांनी, आपण कडवट बोलत असल्याने ते अनेकांना आवडत नाही. परंतु,वाहनधारकांनी कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम करून नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.