नाशिकची रविजा सिंगल आशियातील यंगेस्ट ‘आयर्नगर्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:25 PM2018-12-02T22:25:08+5:302018-12-02T22:28:56+5:30
नाशिक : फ्रान्समधील खडतर अशी आयर्नमॅन स्पर्धा काही महिन्यांपूर्वीच पूर्ण करून आयर्नमॅन झालेले पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची कन्या रविजानेही आॅस्ट्रेलियात पार पडलेली फुल आयर्नमॅन स्पर्धा निर्धारित वेळेपेक्षा १५ तास ५४ मिनिटांत पूर्ण केली आहे़ फु ल आयर्नमॅन ही स्पर्धा वयाच्या १९व्या वर्षी पूर्ण करणारी आशिया खंडातील रविजा ही पहिली मुलगी ठरली असून, ती राष्ट्रीय जलतरणपटू आहे.

पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची मुलगी रविजा सिंगल हिने रविवारी (दि़२) आॅस्ट्रेलियात पार पडलेली ‘आॅस्ट्रेलियन आयर्नमॅन’ ही स्पर्धा १५ तास ५४ मिनिटांमध्ये पूर्ण केली़ आयर्नमॅन स्पर्धेत ४ किलोमीटर स्वीमिंग, १८०़८ किलोमीटर सायकलिंग तर ४२ किलोमीटर रनिंग ही १६ तासांत पूर्ण करावयाची असते़ मात्र रविजाने हे अंतर निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण करून एक नवीन इतिहास रचला आहे़ रविजा ही गत दोन वर्षांपासून डॉ़ पिंप्रिकर यांच्या जीममध्ये सराव करते तर मुस्तफा टोपीवाला यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे़
आॅस्ट्रेलियन आयर्नमॅन स्पर्धेत रविजाने केलेल्या कामगिरीमुळे ती आशियातील यंगेस्ट आयर्नगर्ल ठरली आहे. दरम्यान, रविजाने केलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया तिचे ट्रेनर ताहेर काचवाला यांनी व्यक्त केली आहे़
सार्थ अभिमान
रविजा हिने आॅस्ट्रेलियातील आयर्नमॅन ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली, याचा सार्थ अभिमान आहे़ मुलांसाठी केवळ अभ्यासातच करिअर आहे, असे नाही तर खेळातही चांगले करिअर आहे़
- डॉ़ रवींद्र् सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक