Karnala Bank: भ्रष्टाचारात आकंठ बुडाली; महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचे लायसन RBI ने केले रद्द  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 03:22 PM2021-08-14T15:22:25+5:302021-08-14T15:27:49+5:30

Karnala Nagari Sahakari Bank licence cancelled: बँकेत सुमारे ६० हजार खातेधारक आणि ठेवीदार आहेत. त्यांच्या शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या खाते धारकांचे पैसे परत मिळतील का, यावर आरबीआयने महत्वाची माहिती दिली आहे.

RBI cancels the licence of Karnala Nagari Sahakari Bank of Panvel, Maharashtra | Karnala Bank: भ्रष्टाचारात आकंठ बुडाली; महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचे लायसन RBI ने केले रद्द  

Karnala Bank: भ्रष्टाचारात आकंठ बुडाली; महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचे लायसन RBI ने केले रद्द  

googlenewsNext

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या सहकारी बँकेचे लायसन रद्द केले आहे. रायगड, पनवेल पट्ट्यात मोठे नाव असलेली आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडालेली कर्नाळा नागरी सहकारी बँकेवर (Karnala Nagari Sahakari Bank) आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. कर्नाळा बँक ग्राहकांचे पैसे परत करण्याच्या परिस्थितीत नाहीय. (RBI cancels licence of Karnala Nagari Sahakari Bank, 95% of depositors to get full amount under DICGC)

कर्नाळा बँकेच्या कोट्यवधीच्या गैरव्यवहारात शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आ. विवेक पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले होते. बनावट खात्यावर कर्ज मंजुरी देऊन ती रक्कम त्यांनी स्वतःच्या संस्थेच्या खात्यात वर्ग केली होती. त्यांच्यासह अनेका नेत्यांनी हा फंडा वापरून शेकडो कोटी उकळले आहेत. या प्रकरणी ईडीने जून महिन्यातच  विवेक पाटील यांना अटक केली होती. कर्नाळा बँकेत सुमारे ५२९ कोटींचा घोटाळा झाला. २०१८ मध्ये बँकेच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले होते. रिझर्व्ह बँकेने चौकशीसाठी अधिकारी नेमला. कर्नाळा बँक व्यवहाराबाबत चौकशीत धक्कादायक माहिती मिळाली होती. 

आरबीआयने ९ ऑगस्टच्या आदेशाने कर्नाळा बँकेचे लायसन रद्द करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जर बँकेला काम सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर त्याचा वेगळा परिणाम होईल, असे म्हटले आहे. 

ग्राहकांना पैसे मिळणार?
सहकार आयुक्त आणि सहकार समित्यांचे रजिस्ट्रार, महाराष्ट्रकडे बँक बंद करणे आणि अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लायसन रद्द करताना आरबीआयने जमा केलेल्या कागदपत्रांद्वारे 95 टक्के खातेदारांना डिॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन अॅक्टनुसार (DICGC) पूर्ण रक्कम मागे दिली जाणार आहे. बँकेत सुमारे ६० हजार खातेधारक आणि ठेवीदार आहेत.
 

Read in English

Web Title: RBI cancels the licence of Karnala Nagari Sahakari Bank of Panvel, Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.