बॅँकांना दिलेल्या नोटांचा तपशील देण्यास ‘आरबीआय’चा नकार

By admin | Published: January 2, 2017 06:56 AM2017-01-02T06:56:53+5:302017-01-02T06:56:53+5:30

केंद्र सरकारने ५०० व हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर, बॅँकांना पुरविण्यात आलेल्या नोटांची माहिती जाहीर करण्यास रिझर्व्ह बॅँक आॅफ

RBI refuses to give details of the notes given to the banks | बॅँकांना दिलेल्या नोटांचा तपशील देण्यास ‘आरबीआय’चा नकार

बॅँकांना दिलेल्या नोटांचा तपशील देण्यास ‘आरबीआय’चा नकार

Next

मुंबई : केंद्र सरकारने ५०० व हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर, बॅँकांना पुरविण्यात आलेल्या नोटांची माहिती जाहीर करण्यास रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाने (आरबीआय) नकार दिला आहे.
त्यामुळे व्यक्तीच्या जीविताला आणि शारीरिक सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे कारण देत, त्याबाबत काहीही तपशील देण्यास असर्मथता दर्शविली आहे. त्यांचे हे मौन संशयास्पद असून, जनतेला याबाबतची माहिती मिळविण्याचा अधिकार आहे, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.
८ नोव्हेंबरपासून देशात नोटाटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांच्या सोयीसाठी बॅँकांना चलनात येणाऱ्या किती नोटा पुरविण्यात आल्या? याची माहिती गलगली यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये आरबीआयकडे मागितली होती.
मात्र, त्याबाबत काहीही सांगण्यास स्पष्ट नकार देत, बॅँकेचे केंद्रीय जनमाहिती अधिकारी पी. विजय कुमार यांनी कळविले की, संबंधित माहितीमुळे व्यक्तीच्या जीविताला आणि शारीरिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच सुरक्षा प्रयोजनासाठी विश्वासपूर्वक दिलेल्या माहितीचा स्रोत किंवा
केलेले सहाय्य ओळखता येईल, त्यामुळे ही माहिती उपलब्ध करून देता येत नाही.
अनिल गलगली यांनी आरबीआयच्या हा दावा चुकीचा असल्याचा आरोप करत, या आदेशाविरुद्ध प्रथम अपील दाखल केले आहे. नोटाबंदीच्या दरम्यान, सरकारी बॅँकांच्या तुलनेत काही खासगी बँकांना जास्त रक्कम पुरविली गेली. नोटांची अदलबदल आरबीआयने निश्चित केलेल्या प्रमाणाहून अधिक झाली आहे. त्यामुळे काही लोकांकडे मोठ्या प्रमाणात नवीन चलन मिळाले.
नोटाबंदीमुुळे सामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने, ही माहिती सार्वजनिक करण्यात अधिक लोकहित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: RBI refuses to give details of the notes given to the banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.