नोटाबंदीमुळे रिझर्व्ह बँकेच्या प्रतिष्ठेला धक्का

By admin | Published: December 23, 2016 05:13 AM2016-12-23T05:13:00+5:302016-12-23T05:13:00+5:30

नोटाबंदीच्या निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असून केंद्र सरकारला स्वत:वरच विश्वास नाही, त्यामुळे नोटाबंदीनंतर

RBI repatriation impairment due to non-voting | नोटाबंदीमुळे रिझर्व्ह बँकेच्या प्रतिष्ठेला धक्का

नोटाबंदीमुळे रिझर्व्ह बँकेच्या प्रतिष्ठेला धक्का

Next

मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असून केंद्र सरकारला स्वत:वरच विश्वास नाही, त्यामुळे नोटाबंदीनंतर आतापर्यंत ६० वेळा निर्णय बदलले आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली. गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना मोहन प्रकाश यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेच्या रांगेत १२५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला असताना त्याबद्दल सरकारने संवेदनेचा एक शब्दही काढला नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: RBI repatriation impairment due to non-voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.