स्कॉलरशिपसाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ; धनंजय मुंडे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 08:20 PM2022-01-31T20:20:31+5:302022-01-31T20:21:17+5:30

Application for Scholarship : पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता आदींसाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. 

Re-extension of application for scholarship on DBT portal; Information of Dhananjay Munde | स्कॉलरशिपसाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ; धनंजय मुंडे यांची माहिती

स्कॉलरशिपसाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ; धनंजय मुंडे यांची माहिती

googlenewsNext

मुंबई :  राज्यातील कनिष्ठ, वरिष्ठ आदी महाविद्यालयांसोबत विविध प्रकारच्या व्यावसायिक पदवी, पदविका आदी अभ्यासक्रमांना शिकत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास (Application for scholarship) पुन्हा एकदा मुदतवाढ (date extension) देण्यात आली आहे. 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी साठी अर्ज करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी दिली आहे.

पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता आदींसाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. 

उच्च शिक्षणातील काही विषयातील प्रवेश प्रक्रिया व राउंड अजूनही सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करता यावा, याचा विचार करून विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक साठी अर्ज करणे तसेच पूर्वीच्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Web Title: Re-extension of application for scholarship on DBT portal; Information of Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.