उद्या लक्ष्मीपूजन करण्याआधी या गोष्टी नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 06:46 PM2017-10-18T18:46:38+5:302017-10-18T18:55:58+5:30

एक परंपरा किवा श्रध्दा म्हणून आपण लक्ष्मीपूजन करतोच मात्र त्यामागे काय प्रतिक असतात हे आपल्याला माहित नसतं.

Read this before doing Lakshmi rituals tomorrow | उद्या लक्ष्मीपूजन करण्याआधी या गोष्टी नक्की वाचा

उद्या लक्ष्मीपूजन करण्याआधी या गोष्टी नक्की वाचा

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी हे करणं गरजेचं असतं.लक्ष्मीची पूजा करताना तिच्या वाहनालाही खूश करण्याचा प्रयत्न केला जातो.

लक्ष्मीपूजनादिवशी ऊस, कडुनिंबाची पान आणि रांगोळी या साऱ्यांची आरास केली जाते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या परीने पूजा करतो. पण काहींना ती पूजा करण्यामागचा नेमका उद्देशच माहित नसतो.

ऊस

महालक्ष्मीचे पूजन करताना अनेकजण ऊसाचीही पूजा करतात. त्यामागे असं कारण आहे की महालक्ष्मीचे वाहन हत्ती आहे आणि हत्तीला ऊस प्रिय असतो  त्यामुळे लक्ष्मीची पूजा करताना महालक्ष्मीच्या ऐरावताला खूश करण्यसाठी भक्तगण ऊसाचीही पूजा करतात. पूजा पूर्ण झाल्यावर प्रसादाच्या रुपात ऊसाचे सेवन केले जाते. आपल्या बोलण्यात आणि स्वभावातही गोडपणा यावा यासाठीही हा ऊस ठेवला जातो.

पिवळी कवडी

पुरातन काळापासून आपण लक्ष्मी पूजनावेळी पिवळी कवडी वापरतात. धन आणि लक्ष्मीचे प्रतिक म्हणून या पिवळी कवडीकडे पाहिलं जातं. काहीजण पूजेनंतर या कवड्या तिजोरीत ठेवतात.

पानं

वातावरणात सकारात्मकता ठेवण्यासाठी आपण विविध फुला-फळांची पानं पूजेत ठेवतो. त्यामुळे आपल्यालाही प्रसन्न वाटतं.

रांगोळी

दिवाळीत रांगोळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दारात रांगोळी काढल्याने लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते असं म्हटलं जातं. तसंच लक्ष्मी घरात येत असताना तिच्या स्वागतासाठीही रांगोळी काढली जाते. अंगणात धार्मिक चिन्ह कमळ, स्वस्तिक, कळस यांची रांगोळी काढली जाते.

पाना-फुलांचे तोरण

आपण लक्ष्मीपूजनादिवशी घरासमोर फुलांची तोरणं बांधतो. घरातच नाही तर आपल्या प्रत्येक स्थूल संपत्तीवर फुलांची तोरणं बांधतो. पण तुम्हाला माहितेय का हे तोरण बांधण्यामागे काय कारण असेल. या तोरणात आंबा, पिपंळ आणि अशोकाची पानं लावलेली असतात. हे तोरण लक्ष्मीपूजनादिवशी घरातील मुख्य दरवाजावर किंवा गाडीवर लावले जाते. अशोकाची आणि आब्याच्या पानांमध्ये सकारात्मक उर्जा असते. आपल्या घरातही सकारात्मक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे या पानांची तोरणं आपण घराभोवती लावतो जेणेकरून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होवो. सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याने घरात सुख-शांती नांदेल. म्हणूनच आपण लक्ष्मी पूजनादिवशी पानाफुलांचे तोरण बांधतो.

Web Title: Read this before doing Lakshmi rituals tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.