11 वेळा हनुमान चालिसा पठण केलं! उद्धव ठाकरे सरकार संकटात आल्यानंतर नवनीत राणांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 03:16 PM2022-06-21T15:16:50+5:302022-06-21T15:23:40+5:30

नवनीत राणा म्हणाल्या, मला तर संकटमोचकांकडूनच आशा आहे, की ते महाराष्ट्र संकटातून वाचवतील. एवढेच नाही, तर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्ला करत, हे सरकार आपल्याच कर्माने पडेल असेही राणा यांनी म्हटले आहे.

read hanuman chalisa 11 times says navneet rana and takes jibe on uddhav thackeray government crisis | 11 वेळा हनुमान चालिसा पठण केलं! उद्धव ठाकरे सरकार संकटात आल्यानंतर नवनीत राणांचा टोला

11 वेळा हनुमान चालिसा पठण केलं! उद्धव ठाकरे सरकार संकटात आल्यानंतर नवनीत राणांचा टोला

googlenewsNext


महाराष्ट्रातीलउद्धव ठाकरे सरकार संकटात आल्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेनंतर, त्या चर्चेत आल्या होत्या. तेव्हा त्यांना पती रवी राणा यांच्यासोबत तुरुंगातही जावे लागले होते. आता त्यांनी संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीका करताना, महाराष्ट्राला संकटातून वाचवता यावे, यासाठी आपण 11 वेळा हनुमान चालिसा पठण केले, असे म्हटले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, मला तर संकटमोचकांकडूनच आशा आहे, की ते महाराष्ट्र संकटातून वाचवतील. एवढेच नाही, तर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्ला करत, हे सरकार आपल्याच कर्माने पडेल असेही राणा यांनी म्हटले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, राज्यसभा आणि विधान परिषदेत जर अशा पद्धतीने मतदान होत असेल तर, महाविकास अघाडीत शिवसेनेचे आमदार खूश नाहीत. त्यांनीच भाजपच्या उमेदवारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करत विजयी केले. आम्ही गेल्या आडीच वर्षांपासून महाराष्ट्राल बुडताना बघत आहोत. महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर व्हायरला हवे. आमदार राज्याचे नुकसान होताना बघू शकत नाहीत आणि लवकरच हे संकट दूर करायला हवे. शिवसेनेतील अतर्गत मतभेदातूनच हे संकट निर्माण झाले आहे. एवढेच नाही, तर आपल्या कर्मानेच उद्धव ठाकरे सरकार पडेल, असेही त्या म्हणाल्या. 

राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण, भाजपासोबत चला -
राज्याच्या राजकारणात शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. कट्टर शिवसैनिक आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यासोबत ३० ते ३५ आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या धक्क्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज दुपारी १२ वाजता सर्व आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या बैठकीला शिवसेनेच्या ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित होते. त्यातही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्याच भूमिकेशी सहमती दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा'वर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. यात मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड तसेच संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांची 'मन की बात' बोलून दाखवली. भाजपासोबत चला नाहीतर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा थेट 'अल्टिमेटम' वर्षावर उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना दिला असल्याचं सांगितलं जात आहे.
 

Web Title: read hanuman chalisa 11 times says navneet rana and takes jibe on uddhav thackeray government crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.